आताच्या काळात सर्वाना कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले आहे. सुरूवातीला जसे काही आजार हे ठराविक वयानंतर व्हायचे ते आता जन्मलेल्या मुलांमध्ये पाहायला मिळतात . काही आजार हे शारिरिक असतात तर काही मानसिक .परंतु बहुतांश लोक प्रत्येक आजार शारिरिक कारणांमध्ये शोधायचा प्रयत्न करतात .काहींना आजाराचे कारण मानसिक आहे असे सांगितले जाते परंतु तरीही ते मान्य करत नाहीत कारण समाज काय म्हणेल याची भिती. याहूनही वाईट म्हणजे डॉक्टरकडून बर्याचदा चुकीचे निदान केले जाते आणि त्यामुळे उपचार होतात मात्र माणूस काही केल्या बरा होत नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा स्वतःसाठी ,चांगल्या आरोग्यासाठी योग्य वेळी आजाराचे निदान करून त्यावर उपचार करून घेणे आवश्यक आहे .त्यासाठी पुढील काही शारिरिक आजार व त्यांची मानसिक कारणे आणि त्यासाठी उपाय म्हणून सकारात्मक विचार : Reference: hay. Luise (2010):you can heal your life ,saket publication,pune
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद