श्रुती, एक २८ वर्षांची लग्न झालेली सुंदर तरुणी. जेव्हा तीच लग्न झालं तेव्हा ती फक्त ग्रज्युएट झालेली होती. पण नवऱ्याच्या घरात सर्व पाठिंबा देणारे मिळाले आणि तिने तीच पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं व चांगल्या ठिकाणी नोकरी करू लागली. नवरा खूप समजूतदार, मदत करणारा होता. श्रुतीला जे काही करायची इच्छा व्हायची त्यात तो तिला पाठिंबा द्यायचा व हवी ती मदत देखील करायचा. आणखी काय हवं असतं एखाद्या व्यक्तीला. पण श्रुती जरा वेगळीच होती. तिचा स्वभाव काहीसा वेगळा होता. वेगळा या अर्थाने की तिला कितीही यश मिळालं, कितीही आनंद देणारी गोष्ट मिळाली तरीही ती त्या क्षणी तिच्याकडे जे नाही त्याचा विचार करत राहायची आणि त्यामुळे जे तिच्याकडे आहे त्याच महत्त्व कमी करून टाकायची. परिणामी, सर्व असूनही ती बऱ्याचदा असमाधानी राहायची. या तिच्या स्वभावामुळे ती सतत एक अपूर्णतेचा भाव घेऊन वावरायची आणि चालू परिस्थितीमधील आनंद घालवायची. श्रुतीच्या बाबतीत जे झालं ते आपल्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यात होत असतं. सतत नवीन काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण जे काही चांगलं आपल्याकडे आहे त्याला विसरत...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद