अनेकदा असं होतं की आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात. त्यासाठी लागणारी पुरेशी क्षमता आपल्याकडे असते.तरीही आपल्याला त्या गोष्टी काही केल्या जमत नाहीत आणि या न जमण्याची आपण कळत नकळत खूप कारणे शोधून काढतो. मग त्यामध्ये परिस्थिती कशी अनुकूल नव्हती , साधने कशी उपलब्ध नव्हती, माझी क्षमता कमी पडली आणि सर्वात महत्वाचे ती गोष्ट करायची माझी पात्रता नाही. इथून खरया अर्थाने विचार आणि कृतींच्या खेळाला सुरुवात होते.जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हा आपल्या लक्षात येते की जी कारणे आपण देत होतो परिस्थितीची ,साधनांची ,क्षमतांची ती सर्व आपण स्वतः निर्माण केलेली असतात. जेव्हा आपण म्हणतो अमुक एक गोष्ट करायची माझी पात्रता नाही ,तेव्हा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या गोष्टी करायला अजुन सुरुवातच केली नाही त्यासाठी लागणारी पात्रता आहे की नाही हे...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद