Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

सकारात्मक ईर्षा

    आजचं युग हे स्पर्धेचं युग मानलं जात. अगदी प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी स्पर्धा केली जाते.आता स्पर्धा म्हटलं की समोरच्यापेक्षा अधिक काहीतरी करायची उर्मी आली. त्याबरोबरच कळत - नकळत निर्माण होते ती इर्षा. समोरच्या व्यक्तीकडे जे काही आहे ते आपल्याकडे नाही याचा सतत त्रास होत राहणे, त्यातून मग त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करणे, त्या व्यक्तीला पूर्ण खोटे ठरवणे अशा अनेक गोष्टी घडतात. यातून काही चांगल साध्य होत नाही कारण नकारात्मक भावना , विचार कोणत्याही productive कामाला वाव देत नाहीत त्याउलट मुळात असलेली उर्जा, क्षमता weak होऊन जातात. याहूनही वाईट म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल ही नकारात्मकता असते तिच्यापर्यंतही याची झळ पोहोचते. ज्यामुळे तिचीही कार्यक्षमता कमी होते.कारण इतकी नकारात्मकता सर्वांना हाताळता येतेच असं नाही. मग अशी  स्पर्धा काय कामाची ज्यामुळे फक्त नुकसानच होणार.                  काय करायचं अशा वेळी? नुसता त्रास करून घ्यायचा का? त्यापेक्षा असं काही करता येईल का ज्यामुळे आपल्याला हवं ते ध्येय साध्य होईल आणि कोणाला काही त्रासपण...