माणसाला खूप श्रद्धाळू ,समाजशील असे नेहमी मानले जाते. असा हा माणूस आपल्या जीवनात नेहमी कोणाच्या तरी आधारावर जगत असतो.मग त्याला आपण सोबत म्हणू ,अवलंबन म्हणू किंवा श्रद्धा म्हणू.श्रद्धा! किती मोठा शब्द आहे ना हा! कोणाकोणावर असते आपली श्रद्धा ? आई वडील, मित्र मैत्रिणी, शिक्षक आणि एक महत्वाचं राहिलचं की ,देव! किती contraversial शब्द आहे ना हा. एकीकडे जीव देतो तर दुसरीकडे जीव घ्यायला लावतो.का होत असं? कुठे लिहिलयं का देवाने हे मागितलं ,जवळ येऊ नको म्हटलं,दुसरयाला मार म्हटलं .विचार केला का कधी यावर ?केला नसेल तर करा.असं यामुळे होत कारण आपण या देवाला ,या श्रद्धेला बाहेर शोधायचा प्रयत्न करतो आयुष्यभर.आता ही एक बाजू झाली देवाबद्दलची,त्याच्या श्रद्धेबद्दलची. जी आपल्याला ताकद देते.याप्रमाणेच दुसरी एक बाजू आहे भूत या संकल्पनेबाबतची जी आपल्याला घाबरवून सोडते ,कमजोर करून टाकते . माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचं भूत होत आणि ते दिसतं अस म्हणतात. बरीच लोक आम्ही अनुभवलयं असही म्हणतात .माफ करा पण मी ना कधी देवाला प्रत्यक्ष पाहिलय न...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद