Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

1GB data

    आताच नेटपॅक मारलाय तो पण फक्त १GB, जपून वापरावा लागणार नाहीतर लवकर संपेल आणि नंतर काही उरणार नाही. किती सुंदर व्हिडिओ आहे पहावा का? नको ! नंतर काही उरणार नाही. असं करू सर्व दिवस संपताना पाहू. तोपर्यंत राहुदे हे असच. अरे! दिवसभर बाकीच्या कामांत इतकं व्यस्त व्हायला लागलं की काही पाहताच आल नाही. काही नाही आता गेलं फुकट नेट. उद्या बघेन काहीतरी आणि असं करता करता एक दिवस नेट पॅक संपला..        आयुष्याचं पण असच असतं ना. किती छोट आयुष्य आहे. आताच सर्व जगलं तर पुढे काही मिळणार नाही या एका गोष्टीवरून आपण तो प्रत्येक सुखाचा क्षण अश्या पद्धतीने नाकारतो, टाळण्याचा प्रयत्न करतो की जीवनाच्या अशाच एका संध्याकाळी आपल्या लक्षात येत की अरे ज्या अंतिम सुखाची आपण वाट पाहत होतो ते तर प्रत्येक क्षणी आपल्या पुढे हात पसरून होत. का नाही आपण त्याचा स्वीकार केला? का आपण त्याला वेळोवेळी नाकारलं? याच कारण आपल्याला वाटल की आता हा क्षण जगला तर कदाचित पुढे आपल्यासाठी काहीच उरणार नाही. पुढे कधीतरी आपल्याला मोठा आनंद, खूप सुख मिळेल या अपेक्षेने आपण तो प्रत्येक क्षण गमवला जो आपल्याला त्या...