Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

चला चांगल बोलूया

आज चार महिने होत आले मी senior citizen group  सुरू करून. सुरू केल्यापासून याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात आम्ही वेगवेगळे व्यायाम घ्यायचो, खास त्यांच्यासाठी वेगळे गेम तयार करायचो. अजून बऱ्याच अॅक्टिव्हिटी होत्या जसे की अनुभव कथन, आपल्या आयुष्यातील achievments सांगणे. सर्व जण मनमोकळ करून बोलायची, रमायची. एकंदरीत ग्रुप मस्त चालला होता. पण यात आतापर्यंत माझ्या पाहण्यात आलेली गोष्ट अशी की बरीच जण सर्व अॅक्टिव्हिटी झाल्यावर घरी जायच्या आधी थोडावेळ गप्पा मारण्यासाठी एकत्र बसत. वेगवेगळे विषय निघतच. त्यात एक विषय जास्त असायचा तो म्हणजे सुनांचा विषय. आता सासू लोकांना सूनेविषयी बोलण किती प्रिय असतं सर्वांना ठाऊकच आहे. तर या बोलण्यात चांगल्या गोष्टी कमी आणि गॉसपिंग जास्त असे. म्हणजे माझी सून कशी मला उलटुन बोलते, किंवा घरातलं काम अर्धवट टाकून जाते, सारखी मैत्रिणीसोबत जास्त फिरते एक ना अनेक गोष्टी. ज्या संपतच नसत. जी गत बायकांच्या बोलण्याची तीच पुरुषांची. माझा मुलगा आता माझा राहिला नाही, बायकोचं ऐकतो अश्या गोष्टी. अश्या ह्या गप्पा मी खूप दिवस ऐकत होतो. म्हणून यावर काही उपाय करावा या हेतूने...

सब्र करो!!!

1972मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधील प्रोफेसर मानसशास्त्रज्ञ Walter mischel यांनी लहान मुलांवर एक प्रयोग केला. ज्याचे नाव होते "marshmallow experiment". हा प्रयोग delayed gratification. म्हणजेच नंतर मिळणार समाधान किंवा आनंद यावर आधारलेला होता. यामध्ये लहान मुलांसमोर एक marshmello ठेवली होती व त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही ही marshmello खाऊ शकता पण जर तुम्ही थोडा वेळ थांबलात तर यासोबतच अजून एक marshmello मिळेल. असं सांगून ते निघून गेले. काही वेळानं आत आल्यावर अस दिसल की काही जणांनी marshmello खाली होती व काहीजण तसेच बसले होते. जेव्हा या मुलांचा भविष्यात आढावा घेण्यात आला तेव्हा अस दिसून आल की  जी मुलं थांबली नव्हती त्यांच्या तुलनेत जी मुलं थांबली होती त्यांनी पुढच्या आयुष्यात चांगली कामगिरी केली होती.  तर काय आहे *delyed gratification?* delyed gratification म्हणजे पुढील किंवा भविष्यातील मोठ्या आनंदासाठी आताच्या तात्पुरत्या आनंदकडे दुर्लक्ष करणे. लांबचा आनंद मिळवण्यासाठी वाट पाहणे. पण हे सर्वांना जमत अस नाही. आपल्या रोजच्या जीवनात पण हे होत असत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत...

No means No

स्वरुपा, स्वरुपा पेठे. तिला पहिल्यापासून खाण्याची खूप आवड. ज्याला आपण फुडी म्हणतो ना तस. तर अशी ही स्वरुपा फुडी होती. जेवणात अमुक एक पदार्थ पाहिजे किंवा अमुक एक गोष्ट मला आवडतच नाही असं तिच नव्हत. तिला सर्व प्रकारचं खाण खायला आवडायचं. नवनवीन पदार्थ  explore करायला तिला आवडायचं. तिचा हा स्वभाव सर्वांना माहीत होता. त्यामुळे पार्टी असुदे किंवा कुठे सहज म्हणून खायला जायचं असेल सर्व जण तिला नक्की  बोलवायचे. आग्रह करून खायला घालायचे.शेवटी खाण बनवणाऱ्याला कोणतरी खवय्या मिळाला तर आनंदच होतो. ती सुद्धा कोणाला कधी नाही म्हणत नव्हती.  आता सर्व खात होती म्हटल्यावर त्यात तेलकट, तुपकट, जंक फूड या सर्व गोष्टी पण आल्याच. हे असं एकसारखं  खाल्ल्याने स्वरूपाचं वजन जरा वाढलं होत. तिच तिला ते जाणवू लागलं. म्हणून तिने ठरवलं की आपलं बाहेरच खाण असेल किंवा वेळी अवेळी खाण असेल जरा आटोक्यात आणायचं. त्यासाठी प्लॅन करायचा. सोबत व्यायाम ही होताच. आता ही ठरली फूडी मुलगी. त्यामुळे या सर्व गोष्टी कमी करण तिला जरा अवघडच वाटत होत. पण स्वतःच्या आरोग्याचा विचार करता तिला थोडे दिवस तरी हे टाळायला लागणार ...