आयुष्य हे अनेक चढ उतार ,कष्ट, विविध आव्हानांनी भरलेलं असतं.अगदी साधं, सरळ आयुष्य कधी कोणाच्याच वाटयाला येत नाही.परंतु तरीही आपण नव्या उमेदीने आयुष्य जगत असतो.काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र असे होताना दिसत नाही.छोटया छोटया गोष्टींनी नाउमेद होऊन अशा व्यक्ती आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतात ज्यातून समस्या कमी न होता वाढतात. काय करावं लागतं मग चांगलं आयुष्य जगण्यासाठी?आव्हान तर येतच राहतात त्यांना सामोर कसं जायचं ,त्यावर मात कशी करायची? त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आयुष्यावर प्रेम असावं लागतं ,त्याबद्दल ऋणी असावं लागतं. कारण खूप कमी वेळा असं आयुष्य मिळतं. विविध अनुभवांतून काही धडा घेतला तर आपण खरे शहाणे होतो आणि पुढे कसं वागावं याचं भान येतं पर्यायाने समस्या कमी होतात. आणि शेवटचं व खूप महत्वाचं आपण जेव्हा का जगायचं नाही याची कारणं शोधण्यापेक्षा का जगावं याची कारण शोधली तर जगण्याची उमेद वाढते.कारण शेवटी आपण किती जगलो याहून कसे जगलो याला महत्व...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद