निशाला आज खूप अस्वस्थ वाटत होत. कारण अस होत की ती एका कंपनी मध्ये खूप वर्ष काम करत होती. पण काही कारणामुळे तिला ती कंपनी सोडावी लागली. या कंपनी मध्ये तिच्या खूप साऱ्या आठवणी होत्या. खूप काही शिकायला मिळालं होत. चांगले संबंध तयार झाले होते. पण आता तिला परत तिथे जाता येणार नव्हत. म्हणून ती अस्वस्थ झाली होती. काहीतरी निसटल्यासारखं, चुकल्यासारखं तिला वाटत होत. पुढे काय करायचं हा ही एक प्रश्न होताच. इतक्या वर्षांची सवय, रूटीन सर्वच आता बदलणार. परत नव्याने सर्व घडी बसवायची. या सर्वच गोष्टींचा नाही म्हटलं तरी तिला ताण आलाच होता. या सर्व गोष्टींचा मेळ बसवून परत आयुष्य सुरू करायचं. आपण कुठेतरी अडकु की काय, थांबून जाऊ की काय अशी भीती पण तिला वाटत होती. एक दिवस निशाची मैत्रीण मिता तिला भेटायला आली. तेव्हा निशाची ही अस्वस्थता तिला जाणवली. तिने त्याचे कारण तिला विचारले. तेव्हा निशाने सांगितले. "मिता, ती पहिली कंपनी होती जिथे मी कामाला सुरुवात केली होती. मला तिथे बरच काही शिकायला मिळालं होत. तिथे माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. मी जरी कंपनी सोडली असली तरी माझा मन तिथे अडकून आह...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद