Mr. राणे यांना खूप राग आला होता. त्याला कारणही होत. झालं असं, की राणे हे एका शाळेत गणिताचे शिक्षक. त्यांची त्या विषयावरची पकड पण मजबूत. त्याचबरोबर त्यांचा अनुभव, त्यांचं शिकवण सर्वच कस नीट, समजण्याजोग. पण त्यांची आताची अवस्था काहीशी दिव्याखाली अंधार अशी झालेली. दिव्याखाली अंधार म्हणण्याचं कारण अस की ते ज्या विषयात इतके हुशार त्याच्या नेमक उलटा त्यांचा मुलगा प्रवीण. त्याला गणित हा विषय आवडतही नाही आणि म्हणावा तसा समजतही नाही. इथून खरी समस्येला सुरुवात होते. राणेंना राग येण्याचं कारणही हेच होत. आपण ज्या विषयात पारंगत आहोत त्याबद्द्ल मुलाला जरासुद्धा आस्था असू नये हे काही त्यांना पटत नाही. मग काय, सुरू होतो त्याला गणित शिकवण्याचा अट्टाहास. पण काही केल्या त्यांच्या प्रयत्नांना यश येत नसत. बरं विषयातील काही माहीत नाही अस नाही . तरीही अस का होतय? आपला मुलगा आपलं का ऐकत नाही हे त्यांना समजत नसत आणि त्यातून त्यांची चिडचिड अजून वाढत असते. काय बर असेल खर कारण? का बाहेर उत्तम शिकवणारा शिक्षक मुलाला काही सांगू शकत नाही ? तर याच खर कारण आहे त्यांचा त्यांच्या भूमिकांमध्ये हो...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद