विजय आणि प्रकाश हे दोन शेजारी शेजारी. दोघंही नदीकाठी राहत होते. एके वर्षी खूप जोराचा पाऊस पडून पुर आला व त्यात दोघांच्याही घरामध्ये पाणी आलं. त्यांचा बरच नुकसान देखील झालं. पूर खूपच भयानक होता त्यामुळे नुसत पाणी घरात येऊन थांबल नाही तर घराचा काही हिस्सा पण खराब झाला, उन्मळून पडला. जे काही कष्टाने मिळवलं होत सर्व पाण्यातून वाहून गेलं. दोघांनाही या गोष्टीचा धक्का बसला. पण काही काळाने प्रकाशने पुन्हा कष्ट करून सर्व काही उभारल व नव्याने सर्व निर्माण करून तो मूळपदावर आला. विजयला मात्र ते जमले नाही. तो आधीच्याच दुःखात अडकून राहिला. दोघंही एकाच त्रासात असूनही फक्त प्रकाश त्यातून कसा बाहेर पडू शकला ...? तर त्याचं कारण आहे त्यामध्ये असणारी स्थितिस्थापकत्वाची क्षमता. स्थितिस्थापकत्व म्हणजे आलेल्या संकटांना, समस्यांना सामोरे जाऊन त्यातून धडा घेऊन परत नव्या उमेदीने जगणे, त्या समस्येमध्ये अडकून न राहता त्यातून बाहेर पडून पुन्हा मुळ पदावर येणे. रबर जसा कितीही ताणला तरी परत स्वतःचा आहे तो आकार घेतो तसच ह्या व्यक्ती आलेल्या संकटाना खंबिरपणे सामोरे जाऊन पुन्हा नवीन सुरुवात करतात. ज्याला boun...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद