कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर. आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...
नाही रे, मी खरंच वाईट माणूस आहे. काय उपयोग आहे माझा मुलगा म्हणून? काही करू शकत नाही मी माझ्या घरातल्यांसाठी? ना त्यांना काही देता येत, ना कुठे बाहेर घेऊन जाऊ शकतो. काय उपयोग आहे माझा सांग? एक मुलगा म्हणून, नवरा आणि बाबा म्हणून पण मी अपयशी आहे असं वाटतं मला. गिरीश अगदी हताश होऊन रवीला, त्याच्या मित्राला हे सर्व सांगत होता. पण रविलाच माहीत होतं की हे खर नाही. याचं कारण गिरीश जरी स्वतःला आता दोष देत असला, नावं ठेवत असला तरी त्याचे जे काही कष्ट आहेत, आपल्या कुटुंबासाठी तो ज्या पद्धतीने झटत होता ते सर्व रवी पाहत आला होता. कोणाचा आधार नसताना, मदत नसताना त्याने स्वतःच्या बळावर सर्व मिळवलं होतं, तयार केलं होतं. आता एकंदरीत परिस्थितीच अशी होती की काहीवेळा त्याला मुलांच्या गरजा, हौशी इच्छा असूनपण पूर्ण करता येत नसत. आता देखील त्याच्या मुलीला चिन्मयीला सहलीसाठी जायचं होतं. पण फी जास्त असल्याने त्याला तिला पाठवता आलं नाही. त्यामुळे ती हिरमुसून बसली होती. कामातून वेळ काढून घरातल्यांना त्याला फारसा वेळ देता येत नसे, आणि फार कुठे घेऊन जाता येत नसे. या सर्व गोष्टींचं त्याला दुःख होई. पण आज त्याचं हे द...