Skip to main content

Posts

Showing posts from July, 2024

जीभेचा वापर

इसाप चतुरस्त्र कथाकार, कवी आणि विनोदाचा पंडित होता. तो अत्यंत बुद्धिमान होताच, शिवाय द्रष्टा तत्त्ववेत्ताही होता. 'इसापनीती' या नावाने त्याच्या कथा प्रसिद्ध असून दोन-अडीच हजार वर्षांनंतरही त्याच्या कथांची मोहिनी माणसांच्या मनावर कायम आहे. इसाप झांथसच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत असे. एके दिवशी झांथसने आपल्या मित्रांसाठी मेजवानीचा बेत केला आणि इसापला उत्तम स्वयंपाक करण्याचा हुकूम दिला. इसापने बोकडाच्या जिभेचे नानाप्रकारचे अत्यंत रुचकर पदार्थ तयार केले. सर्व पाहुणे त्या पदार्थांवर तुटून पडले. पण इसापने पदार्थ तयार करताना बोकडाची केवळ जीभ वापरली या गोष्टीचा झांथसला राग आला. त्याने इसापला त्याविषयी विचारले असता इसाप म्हणाला, 'जगात जिभेइतकी चांगली गोष्ट दुसरी कुठलीच नाही.' दुसऱ्या दिवशी झांथसने पुन्हा मेजवानी आयोजित केली. कालच्याच सर्व मित्रांना त्याने मेजवानीसाठी पुन्हा निमंत्रित केले आणि मुद्दामच मेजवानीसाठी सर्वात वाईट पदार्थ करण्यास इसापला सांगितले. सर्वजण पाहतात तर आदल्या दिवसाप्रमाणेच बोकडाच्या जिभेपासून बनवलेले नानाप्रकारचे पदार्थ ताटात वाढलेले होते. ते पाहून झांथस...

एकाग्रता वाढवायची आहे???

कोणतही काम नीट व्हायला हवं असेल तर त्यात एकाग्रता खूप महत्त्वाची असते. त्याशिवाय गोष्टी आपल्याला नीट लक्षात येत नाहीत. याचं एकाग्रतेचे महत्त्व पटवून सांगणारी स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट. आपल्याला आपल्या आयुष्याकडून नेमक काय हवं आहे, आपल्याला नेमक कोणतं कार्य करायचं आहे याचा शोध घेण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी १८९०च्या जुलैमध्ये पायीच भारतभ्रमण करायचं ठरवलं. असाच प्रवास चालू असताना नोव्हेंबरमध्ये ते मेरठला आले. त्यांच्याबरोबर इतर संन्यासी बंधुही योगायोगाने त्यावेळी तिथे आले. बऱ्याच दिवसानंतर झालेल्या या भेटीमुळे सर्वानाच आनंद झाला आणि ते एकत्र राहू लागले.  स्वामीजी त्यावेळी मेरठमध्ये अभ्यास करत होते. खूप वाचनही चालू होते. स्वामी अखंडानंदाना ते ग्रंथालयात पाठवत आणि सर जॉन ल्युबक यांच्या समग्र वागमयाचा एकेक ठोकळ्यासारखा खंड घेऊन येण्यास सांगत. दुसऱ्या दिवशी आधीचा खंड परत करायचा आणि नवा घेऊन यायचा. असे बरेच दिवस चालले होते.  त्या ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल होते त्यांना वाटले की स्वामीजी हे भलेमोठे जाडजूड ग्रंथ वाचतच नसावेत. केवळ लोकांवर छाप पाडण्यासाठी ते रोज एक खंड वाचीत आणि परत क...

संगत का महत्त्वाची आहे????

तू आधी असा वागत नव्हतास, असा उलट सुलट बोलत नव्हतास, जेव्हापासून त्या वरुणसोबत फिरायला लागलास तुझं वागणं बोलणं पण तसच झालंय. काहीही म्हणा, तुमच्या गायत्रीसोबत राहायला लागल्यापासून आमची सुमन बरीच बदललीय. चार चांगले गुण घेतले तिने तिच्याकडून. असं हे बोलणं आपल्या रोजच्या जीवनात आपण सारखं ऐकत असतो. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, आपले मित्र मैत्रिणी आपल्या आजूबाजूची लोक चांगली असली पाहिजेत, आपली संगत चांगली पाहिजे असं सारखं म्हटलं जातं. याचं कारण लोकांचा, त्यांच्या सहवासाचा आपल्यावर परिणाम होत असतो, प्रभाव पडतो असतो आणि आपण स्वतः देखील अनुभवलं असेल. ज्यांच्या सानिध्यात आपण खूप काळ असतो, त्यांचे विचार वागणं तरी आपल्यात उतरत आणि पण नकळतपणे त्यांच्यासारखं वागायला सुरुवात करतो. आपली विचार करण्याची पद्धत तशी होऊन जाते, इतकंच काय वाटतं असेल, जाणवत असेल याची देखील आपल्याला जाणीव होते आणि आपण त्यांना कनेक्ट होऊन जातो. या गोष्टी आपोआप होत नाहीत तर याला शास्त्रीय कारण आहे. सुरुवातीला प्राण्यांवर आणि नंतर माणसांवर केलेल्या निरिक्षणातून, प्रयोगातून हे सिद्ध झालंय की माणूस समोरच्याच्या वागण...

चांगल्या झोपेसाठी Sleep Hygiene

धावती लाईफस्टाईल, कामाच्या बदललेल्या वेळा, टेन्शन, फोनचा अतिवापर यासारख्या गोष्टींमुळे आपल्या झोपचे चक्र बदलून गेले आहे हे आपण नाकारणार नाही. आपल्या  चांगल्या आरोग्यासाठी किमान ७-८ तासांची झोप ही आवश्यक आहे. परंतु या बिघडलेल्या, बदललेल्या झोपेच्या चक्रामुळे आरोग्यावर उलट परिणाम होतो. निद्रानाश, चिडचिड, पित्त यासारख्या समस्या जाणवू लागतात. कामावर याचा परिणाम होतो, लक्ष लागत नाही. म्हणून जशी बाकी गोष्टींसाठी आपण स्वच्छ्ता पाळतो, hygiene पाळतो तसच झोपेसाठीसुद्धा ती पाळली पाहिजे ज्याला ' sleep hygiene ' म्हटले जाते. Sleep hygiene म्हणजे काय तर चांगल्या, पुरेश्या झोपेसाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे, काही नियम पाळणे, चांगल्या सवयी लावून घेणे. हे नियम कोणते ते पाहू... १. झोपेची निश्चित वेळ ठरवणे: चांगल्या झोपेसाठी त्याची निश्चित वेळ ठरवणे खूप आवश्यक आहे. समजा आपली झोपायची वेळ १० असेल तर आपण त्याआधी आपली बाकीची काम आवरून झोपी गेले पाहिजे. बऱ्याचदा काही गोष्टी होतात, emergency असतात ज्यामुळे ही वेळ मागे पुढे होऊ शकते. पण आपला जास्तीत जास्त प्रयत्न हा असला पाहिजे की आपण ठरलेल्या वेळेत ...

रव्याचे लाडू

अगं आई, जरा मला मदत करतेस का? खूप दिवसांपासून लाडू करायचं ठरवत होते पण वेळच मिळत नव्हता. आज कसही करून बनवायचं ठरवलं. पण अग हे काय जमुनच येत नाहीये बघ. आधी व्हिडिओ पाहिला, त्यात कसं मोजून मापून घालतात तसच घातलं. रवा नीट भाजला, तूप, साखर सर्व प्रमाणात पण तरी हे लाडू काही होत नाहीयेत. कंटाळून शेवटी तुला फोन केला. रश्मी एका दमात तिच्या आईशी सर्व बोलत होती.  अगं हो, थांब थांब. जरा श्वास घे आणि माझं ऐक. आपण हे जे पदार्थ बनवतो ते अगदी आपल्या नात्यांसारखे असतात आणि नाती कधी मोजून मापून अगदी तंतोतंत सांभाळली जात नाहीत ग. नात्यांना जोडून ठेवण्यासाठी लागतो साखरेसारखा गोडवा आणि हा गोडवा तुझ्या त्या शुगर फ्री ने किंवा कमी पाकाने येत नाही. त्यासाठी तो पाक चांगला तयार व्हावा लागतो. नाती जोडताना, सांभाळताना घाई गडबड, असंयमी असून कसं होईल? तिथे संयम लागतोच. इथेही तसच आहे. रोज एकमेकांशी केलेलं बोलणं, एकमेकांना दिलेला आधार नात्यांमधला ओलावा टिकवून ठेवतो, त्यांच्यात कोरडेपणा येऊ देत नाही. तो कोरडेपणा येऊ द्यायचा नसेल तर लाडूमध्ये तूप नको का घालायला?  जी गोष्ट बांधून ठेवते तिचं कमी केली तर तो पदार...

मेंदू जागा तरी शरीराला अर्धांगवायू

वरुण गाढ झोपेत होता. अचानक त्याला जाग आली. जाग येण्याचं कारण, त्याला असं वाटू लागलं की आपल्या छातीवर कोणीतरी बसलय. जीव भयंकर घुसमटायला लागलाय, मदतीसाठी हाक मारायचा प्रयत्न केला तरी इंचभर देखील हलता येत नाही की तोंडातून आवाज फुटत नाही. समोर सर्व दिसतंय पण आपण काहीच करू शकत नाही, असं वाटू लागलं जसं काय मेंदू तर जागा आहे पण शरीराला अर्धांगवायू झालाय. हे असं का होतंय याचं कारणच समजत नाही आणि भीती मात्र वाटते. खूप कष्ट केल्यावर जाग येते आणि तेव्हा समजत आपण झोपेतच होतो.  वरूणला आलेला अनुभव नेमका कसला होता? असा अनुभव आपल्यापैकी कोणाला आलाय का? झोपेत झालेल्या या भीतीदायक अनुभवाला म्हणायचं तरी काय ? स्लीप पॅरालिसिस : वरुणला आलेल्या या अनुभवाला स्लीप पॅरालिसिस असं म्हणतात. या अवस्थेत आपण स्वत:ला या भयानक  अनुभवातून जसे की, उंचावरुन खाली पडणे, शरीराचा एखादा अवयव वेगळा झाल्याचा दिसणे, कोणीतरी अंगावर बसल्याचा भास होणे यातून वाचवण्यासाठी, मदतीसाठी हाका मारतो पण आपला आवाज निघत नाही किंवा आपल्याला जागेवरून हलता देखील येत नाही. एकप्रकारे आपल्या शरीराला पक्षाघात होतो.  या अवस्थेत आपल्या मे...

गुरूपौर्णिमा

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः ज्ञानरूपी अमृत देऊन, एका मातीच्या कच्च्या गोळ्याला सुबक मूर्तीचा आकार देण्याचं काम जो करतो तो म्हणजे गुरू. आपलं अख्ख आयुष्य घडविण्यात आपल्या गुरूचा खूप मोठा वाटा आहे. योग्य वेळी, योग्य वयात मिळालेला गुरू आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन जातो आणि याच गुरूचा सन्मान करण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.  आपले आई वडील, शिक्षक यांना आपण अनेकदा गुरू म्हणून केंद्रस्थानी मानतो जे खरं आहे. आपल्या आयुष्याला आकार देण्यात सर्वात मोलाचा वाटा यांचा असतो. पण याव्यतिरिक्त देखील असे गुरू आपल्या आयुष्यात येऊन जातात, जे आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि ज्यांच्याकडून आपण डोळसपणे शिकलं पाहिजे. १. अनुभव: कोणी कितीही काहीही शिकवलं तरी अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरू आहे. जे आपण आपल्या अनुभवांमधून शिकतो ते आपल्याला कोणीही हात धरून शिकवू शकत नाही. फक्त हे शिक्षण तेव्हाच घेता येत जेव्हा आपण त्या अनुभवांना डोळसपणे, तटस्थपणे पाहायला शिकतो. एकदा ठेच लागली की पुन्हा जाताना काळजी घेणे ही...

काय आहे hypnic jerk????

आपण निवांत झोपायची तयारी करतो आणि झोपतोसुद्धा, पण झोप लागते तेवढ्यातच आपल्याला झोपेतच उंचावरून खाली पडल्याचा भास होतो आणि आपण दचकतो. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. झोपल्या झोपल्या हे असं का होतं हे आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही आणि याचं कारण पण समजत नाही. तर सर्वात आधी याला काय म्हणतात हे समजून घेऊ.. तर धड पूर्ण झोपही नाही आणि पूर्ण जागही नाही अश्या मधल्या अवस्थेत झालेल्या या भासाला शास्त्रीय भाषेत hypnic jerk (हायप्निक जर्क) असे म्हटले जाते. असे झटके किंवा हे असे भास तेव्हाच जाणवतात जेव्हा व्यक्ती ना पूर्ण झोपेत असतो ना पूर्ण जागा असतो. साधारण ७० टक्के लोकांना हा अनुभव येतो असे म्हणतात. आता हे असं होण्यामागचे कारण काय आहे?? तर याला अनेक कारणे आहेत त्यातलं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झोपेच्या वेळी शरीर पूर्ण विश्रांतीच्या स्थितीत जाते. यावेळी स्नायूंना विश्रांती मिळते आणि हृदयाची गतीही मंदावते. या दरम्यान, हृदय योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासण्याचं काम मेंदू करतो आणि त्यामुळे असे धक्के जाणवतात. याशिवाय, जेव्हा स्नायू विश्रांतीच्या स्थितीत जातात तेव्हा मेंदूल...

टाळी कधी एका हाताने वाजत नाही...

असं कसं विनाकारण त्याने तुला त्रास दिला, तूच काहीतरी केलं असशील. गोष्टी एका बाजूने कधी होत नसतात आणि टाळी कधी एका हाताने वाजत नाही. काहीतरी केल्याशिवाय का त्याने /तिने असं केलं. भावंडांच्या अगदी साध्या भांडणापासून ते नात तुटायला येईल इथपर्यंत झालेल्या वादात अशी वाक्य आपण सर्रास ऐकतो. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, थोडक्यात याचा अर्थ कोणतीही गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असतंच. विनाकारण काही होत नसतं.  पण हे वाक्य खरंच इथपर्यंतच मर्यादित आहे का? अजून कुठे याचा संदर्भ येतो? जरा खोलवर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी येतो आणि हे आपल्याला समजलं तर आपल्या बऱ्याच समस्या सुटू शकतात, त्यांच्यावर उपाय शोधता येऊ शकतात. कसे ते पाहू... जेव्हा आपल्यासोबत काहीही घटना घडते, काही प्रसंग घडतात किंवा आपण जेव्हा एखाद्या प्रसंगाला सामोरे जातो तेव्हा त्यातून ज्या आपल्या प्रतिक्रिया येतात त्यांना सर्वस्वी जबाबदार आपण त्या घटनेला, त्या प्रसंगाला ठरवतो. अगदी वरच्या गोष्टींमध्ये पण बहीण/भावाने तसे केले म्हणून मी असा वागलो. त्या वेळी तशी परिस्थिती होती म्हणून मी अशी reaction दिली. इथे पहिली टाळी म्हणून आपण ...