Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

एक दिवस....फक्त माझा ,स्वतःचा !

         आज कामावर जायला खूप उशीर झालायं,लवकर आवरलं पाहिजे .अरे,किती काम पडलीत कधी होणार...उद्या submission ची शेवटची तारीख आहे ,लवकरात लवकर पूर्ण करायला हवं..असे आणि याहूनही अधिक विचार रोज आपल्या डोक्यात घोळत असतात .इतकी दमछाक होत असतानाही एक विचार सातत्याने डोक्यात येत असतो rather  आपण ठसवत असतो .हे सर्व कोणासाठी चाललयं? माझ्यासाठी ,माझ्या चांगल्यासाठी आणि जरी इतरांसाठी खूप काही करत असलो तरी ते इतर नसतात.ती आपल्या आयुष्याची महत्वपूर्ण नाती असतात .वेळ न पाहता सतत काही ना काही चालू असतं.थोडाफार वेळ मिळाला तरीही तो इतरांसोबत जातो.काहींच्या वाट्याला तेही येत नाही .आयुष्यभर सगळ्यातलं सगळं केलं जातं.परंतु असे काही क्षण जे फक्त स्वतःसोबत घालवायचे होते, स्वतः जगायचे होते ते मात्र निघून गेलेले असतात.          असं म्हटलं जातं की आयुष्याचं खरं सार्थक आपण स्वतः बरोबर दुसरयांसाठी घालवलं कि होतं.परंतु या विचाराने काही जण स्वतःला पूर्णपणे विसरून केवळ दुसरयांसाठी जगतात.शेवटपर्यंत स्वतःचा शोध मात्र घेता येत नाही. इथे खरी गरज असते इतरांना काही का...

अशी एक जागा मन मोकळं करायची......

       आपल्या रोजच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात ,चांगले-वाईट ,आपल्याला आनंद देणारे प्रसंगी दुःखी करणारे,अगदी साधे किंवा खूप महत्वाचे .हे प्रसंग म्हणजे आपल्या आयुष्यातले असे क्षण असतात ज्यांचा आपण अनुभव घेतलेला असतो व ज्याच्याबद्दल आपल्याला भरभरून बोलायचं असतं, आपलं मन मोकळं करायचं असतं.आता बोलायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात माणसं ,आपल्या जवळची ,आपल्याला समजून घेणारी. पण आताच्या technologyच्या युगात जिथे आपलं कोण आणि परकं कोण यातला फरकच समजेनासा झालाय ,संवादच संपत चाललायं तिथे प्रश्न असा पडतो की कोणाशी बोलायचं आणि मन किती मोकळं करायचं.....               याचा अर्थ सर्व काही मनात साठवून ठेवायचं का? अजिबात नाही.ही वेळ असते अश्या जागा शोधायची जिथे आपण पूर्णपणे व्यक्त होऊ शकतो,जिथे आपल्याला कोणीतरी काही बोलेल याची भीती नसते. मग ती जागा असू शकते आपण स्वतः .इतरांशी बोलण्यासाठी आपण इतके धडपडत असतो की आपला स्व संवादच संपून जातो .बरेचदा इतरांशी बोलून ज्या गोष्टींचा उलगडा होत नाही तो स्वतःशी बोलून होतो.आपल्या बागेतली झाडं ज्यांच्य...