Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

इच्छा- अपेक्षा

रिया खूपच दुखावली होती. रडत रडत तोंडाचा पट्टा तर एकसारखा चालूच होता. ' तो मला समजूनच घेत नाही, इतकी वर्ष आम्ही रिलेशन मध्ये आहोत,  मी मात्र त्याच लगेच ऐकायचं, त्याला मात्र तस करता येत नाही. मी दर वेळी सांगते; अस वागू नको, असा राहू नको. पण नाही स्वतःला हवं तसच करायचं. मी काही अपेक्षा ठेवूच नये का त्याच्याकडून"? हा प्रश्न अर्थात मलाच विचारला गेला होता. विचार केला जरा वेगळ्या पद्धतीने त्यावर उत्तर देऊ. पण त्याआधी रियाला शांत करण गरजेचं होत. तिला शांत केलं, पाणी दिलं आणि ती जरा शांत झाल्यावर एक प्रश्न विचारला. "रिया जर तुझी मनस्थिती आता जरा ठीक झाली असेल तर मी तुला एक गोष्ट सांगू का? तू ऐकशील का"? ती म्हणाली, हो ऐकेन. चालेल ऐक तर मग! मी गोष्ट सांगायला सुरुवात केली. "एका गावात जत्रा चालू असते, पाळणे, खेळण्यांची दुकान सर्व काही छान मांडलेल असत. सर्व लहान मूल , मोठी माणसं फिरत, आनंद घेत असतात. ह्यात होत काय, एक मुलगा एका फुगेवल्याकडे बघतो. त्याच्याकडे एकच फुगा उरलेला असतो. त्याला तो खूप आवडतो आणि तो मनोमन देवाकडे प्रार्थना करतो की देव मला तो फुगा मिळुदे. इथे खर गंमत हो...

स्वातंत्र्य विचारांचे

राजाराम हा एक साधा गिरणी कामगार. रोजच्या वेळात गिरणीत जाणे, दिलेलं काम करणे आणि घरी येणे. घरात त्याची बायको व दोन मुले असा त्याचा परिवार होता. प्रकाश १२वर्षांचा तर दीपक १०वर्षांचा. घरची परिस्थिती काही फार चांगली नव्हती. त्यात राजाराम मिळालेला अर्धा पगार दारू पिण्यातच घालवत असे. दारू पिऊन आल्यावर मग घरी बायकोसोबत होणारी भांडणे, तिला शिवीगाळ करणे, मुलांवर रागावणे हे सर्व नेहमीच झालं होत. दोन्ही मुलं याच वातावरणात वाढली. यातूनच दोघांचे शिक्षण चालू होते. प्रकाशला मुळातच शिक्षणाची कमी आवड; त्यात घरची परिस्थिती अशी असल्याने त्याला सांगायला नेहमी एक कारण मिळायचे की कशी आमची परिस्थिती चांगली नाही. कसं मला सारखं adjust करावं लागत वगैरे. अशी कारण सांगतच त्याने कसेबसे १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व तो वडिलांच्या जागी नंतर गिरणीत कामाला लागला. त्यालाही बरीच व्यसन लागली होती.  दीपक मात्र याउलट होता. लहानपणापासून शिक्षणाची आवड. त्यात वडिलांचे वागणे, आईची होणारी घुसमट हे सर्व त्याला दिसत होते. त्याच वेळी त्याने ठरवले की खूप शिकायचे आणि सर्वांना सुखात ठेवायचे. त्याप्रमाणे त्याने खूप प्रयत्न करून ...

Control and Influence

सुमन खूप वैतागली होती. तिची चिडचिड होत होती. त्याच कारणही तसच होत म्हणा. तिचा ८ वर्षाचा मुलगा अनय, तिने सांगितलेली कोणतीही गोष्टी कधी नीट ऐकत नसे. त्याला ओरडून, रागावून, प्रेमाने समजावून झाल पण परत पहिले पाढे पंचावन्न. एक दिवस ती सहज तिच्या मैत्रिणी च्या, वर्षाच्या घरी गेली. दारावर असताना सुमनच्या कानावर वर्षाचं आणि तिच्या मुलाचं बोलण आलं. "अरे वा! राज, very good! पसारा होऊ नये म्हणून तू ही सर्व खेळणी नीट एकत्र करून ठेवलीस हे खूप चांगलं केलं. आता अजून एक छोटं काम करशील का ? जशी तू ही सर्व खेळणी एकत्र करून ठेवली तशीच ती आत तुझ्या रूममध्ये ठेवशील? म्हणजे ती हरवणार नाहीत आणि पुढच्या वेळी तुला लगेच मिळतील"- वर्षा.  " हो आई, लगेच ठेवतो" - राज. बाहेरून सुमन हे सर्व ऐकत होती. ती आत आली व वर्षाला म्हणाली, "वर्षा अग तुझा मुलगा किती गुणी आहे. तू सांगितलेलं लगेच ऐकतो. नाहीतर माझा अनय, माझी एक गोष्ट ऐकत नाही". वर्षाला सुमनचा हा प्रॉब्लेम माहीत होता.  तिने सुमन ला तिथेच बसायला सांगितले व ती आत गेली. थोड्या वेळाने ती पाणी घेऊन आली व सुमनला म्हणाली, सुमन तुझा हात पुढे कर...

SMART ध्येय

तुम्ही कधी कोड सोडवलं आहे का? ज्यामधे एक end point असतो आणि तिथपर्यंत जायचे विविध मार्ग दिलेले असतात.  त्यातील योग्य मार्ग निवडून आपल्याला जायचं असत. पण काय होईल जर end point दिलाच नसेल तर? आपल्याला माहीतच नसेल आपण कुठपर्यंत जायचं आहे , कशासाठी जायचं आहे तर आपण कोणत्याही मार्गाने गेलो तरी काही फरक पडेल का? बरं अशा जाण्याला तरी काही अर्थ राहील का?   ध्येयहिन आयुष्याच पण असंच असतं. आपल्या आयुष्यात जर ध्येय नसतील तर आपण का जगतो हे आपल्यालाही समजत नाही. म्हणून आयुष्याला आकार येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी ध्येय असण खूप आवश्यक आहे. बरं! ध्येय ठरवायची तर आहेत पण ती कशी? उदा. मला दोन दिवसात 20kg  वजन कमी करायचं आहे. या ध्येयाला ना कोणता आराखडा ना कोणतं मोजमाप. अशा प्रकारची अवास्तव ध्येय ठेवून आपल्या हाती निराशाच येते. म्हणूनच ध्येय ही 'smart' असावी लागतात.म्हणजेच S-(specific)- कोणतेही ध्येय ठरवताना ते स्पष्ट आणि विशिष्ट असेल तर आपल्याला पूर्ण करताना अडचणी येत नाहीत. M- (measurable)- ध्येय ठरवल्यावर त्याच मापन करण गरजेच असत. त्यामुळे आपल्याला आपल्या कामाची गती समजते व त्यानुसा...

बहर आयुष्याचा

आपण नर्सरी मध्ये जाऊन एक छान अस रोपट घेऊन येतो. त्याला घरी आणून मातीत रुजवतो. त्याची देखभाल करायला सुरू  करतो. पण अचानक काय होत कोण जाणे, त्याची वाढ ना हळूहळू खुंटायला लागते, हळू हळू पानांना बारीक छिद्र पडू लागतात, ती पांढरी होऊ लागतात. बारकाईने पाहिल्यावर आपल्या लक्षात येत की त्याला कीड लागली आहे. अश्यावेळी करायचं काय? इतक्या प्रेमाने आणलेलं झाड; जगवायला तर पाहिजे. म्हणून आपण कीटकनाशक, तसच वेगवेगळ्या औषधी पानांची रसायन करून ती झाडावर फवारायला लागतो. काय आश्चर्य? झाडावरची कीड हळूहळू नाहीशी होऊन झाड सुंदरपणे फुलतं आणि त्याची वाढ छान पद्धतीने होऊन ते बहरत.        मित्रांनो, आपल्या आयुष्याचं पण ना असच असत. आपलं हे आयुष्य सुंदर झाडाप्रमाणे वाढत असत. परंतु अचानक कुठूनतरी एक नकारात्मक विचारांची कीड येते आणि आपल्या या आयुष्याला पोखरायला सुरू करते. ही कीड असते अतिरिक्त केलेल्या चिंतेची, ही कीड असते स्वतः ला सतत दोष लावण्याच्या सवयीची, ही कीड असते आयुष्यालाच चुकीच्या पद्धतीने पाहायची ज्यात आपण गुरफटून जातो आणि आपला विकास, आपली वाढ थांबते.        ...

गोष्ट छोटी डोंगराएवढी

 एका जंगलात एक छोटासा ससा राहत होता. एक दिवस काय झालं जंगलात जोराचा वारा सुटला त्या वाऱ्याने झाडाचे एक पान तुटले , ढोलीत आले आणि सशाच्या डोक्यावर येऊन पडले. ससा मुळातच भित्रा त्यात डोक्यावर पान पडल्यावर तो अजूनच घाबरला आणि जंगलभर ओरडत सुटला की आभाळाचा एक तुकडा माझ्या डोक्यावर येऊन पडला. आभाळ तुटल, धावा, वाचवा! त्याच्याबरोबर त्याने इतर प्राण्यांनासुद्धा घाबरवून सोडलं. शेवटी जंगलातील एका बुद्धिमान प्राण्याने ढोलीत जाऊन पाहिले व खऱ्या गोष्टीची खात्री करून घेतली.  भित्र्या सशाची ही गोष्ट आपण सर्वांनी ऐकली किंवा वाचली असेल.  या सशाप्रमाणेच आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी वाढवून सांगायची सवय असते. ज्याला आपण ' पराचा कावळा करणे' किंवा 'राईचा पर्वत करणे' असही म्हणतो. उदा. परीक्षेत १०मार्क जरी कमी झाले तरी," अरे बापरे! माझे  मार्क्स किती कमी झाले! आता माझं खूप नुकसान होणार". अर्धा तास जरी लाईट गेली तरी "अरे देवा! इतका वेळ मी अंधारात कसा राहणार"? अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात. बऱ्याचदा या लोकांच्या तोंडात अरे बापरे! ...

अपराधीपणा

प्रत्येक व्यक्तीची आयुष्य जगायची एक पद्धत असते.ज्यामधे कसं वागायचं, कसं वागू नये, काय करावं , काय करू नये हे ठरलेले असते. ज्याला आपण आदर्श  असे म्हणतो. जे प्रत्येकाचे वेगळे असतात.  उदा. समीर हा एक मध्यमवर्गीय तरुण. एका बँकेत नोकरी करणारा. त्याला स्वतः च्या आयुष्याबद्दल काही फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. जी परिस्थिती आहे त्यात आनंदी आणि समाधानी राहणे असा त्याचा स्वभाव.  फक्त एकच गोष्ट त्याला आवडत नसे किंबहुना त्याच्या आदर्शात बसत नसे ती म्हणजे खोटं बोलणे. कोणाशीही कोणत्याही परिस्थितीत आपण  खोटं बोलू नये अस त्याच म्हणणं.पण एक प्रसंग  असा आला की त्यात समीरकडे काही पर्याय उरला नाही आणि त्याला नाईलाजाने खोटे बोलावे लागले. त्याला खोटं बोलावं लागलं इथपर्यंत ही गोष्ट थांबली नाही; तर त्यातून त्याला अपराधीपणा म्हणजेच guilt यायला लागला.          कधी येतो माणसाला अपराधीपणा?  " जेव्हा आपल्याकडून  एखादी चूक होते आणि आपण स्वतःच्या नजरेतून उतरतो ". या भावनेमध्ये व्यक्ती केलेल्या चुकीची जबाबदारी घ्यायची सोडून स्वतःला दोष द्यायला सुरू करते आणि एख...