भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर सुधीर मोघे यांच्या कवितेतल्या या ओळी आपल्याला खूप काही सांगून जातात. प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य हे शांत, विना कटकटीच आणि आनंददायी असावं अस वाटत असत. कोणालाही आपल्या आयुष्यात दुःख नको असतात, ओढाताण नको असते. आपल्या मनासारख्या गोष्टी व्हाव्यात यासाठी माणूस आयुष्यभर खटपट करत राहतो, न थांबता झटत राहतो. पण सर्व आपल्या मनासारखं होणार असेल तर ते आयुष्य कसलं? आपल्याला नको असलेल्या गोष्टी, अनपेक्षित घटना या होत राहतात. पण त्यात गुंतून पडून पुढचा मार्ग अजून अडचणीचा करण, होऊन गेलेल्या गोष्टी न स्वीकारता त्यापासून लांब पळण योग्य नाही. जसं की मनाली, मनाली आणि सुयश हे जवळपास चार वर्ष एका नात्यात होते. काही कारणामुळे हे नात पुढे जाऊ शकले नाही. याचा परिणाम मनालीने स्वतःला त्रास करून घ्यायला सुरुवात केली. सुरवातीचा काही काळ तिला ही गोष्टच मान्य होत नव्हती की नात तुटल आहे. ती स्वतःला सत्य स्वीकारू देत नव्हती, त्यापासून पळून जात होती. एखादी जखम भरून काढण्यासाठी जो एक ठराविक वेळ त्याला द्यायला पाहिजे तो तिला काही केल्या ...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद