Skip to main content

सकारात्मक ईर्षा

    आजचं युग हे स्पर्धेचं युग मानलं जात. अगदी प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी स्पर्धा केली जाते.आता स्पर्धा म्हटलं की समोरच्यापेक्षा अधिक काहीतरी करायची उर्मी आली. त्याबरोबरच कळत - नकळत निर्माण होते ती इर्षा. समोरच्या व्यक्तीकडे जे काही आहे ते आपल्याकडे नाही याचा सतत त्रास होत राहणे, त्यातून मग त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करणे, त्या व्यक्तीला पूर्ण खोटे ठरवणे अशा अनेक गोष्टी घडतात. यातून काही चांगल साध्य होत नाही कारण नकारात्मक भावना , विचार कोणत्याही productive कामाला वाव देत नाहीत त्याउलट मुळात असलेली उर्जा, क्षमता weak होऊन जातात. याहूनही वाईट म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल ही नकारात्मकता असते तिच्यापर्यंतही याची झळ पोहोचते. ज्यामुळे तिचीही कार्यक्षमता कमी होते.कारण इतकी नकारात्मकता सर्वांना हाताळता येतेच असं नाही. मग अशी  स्पर्धा काय कामाची ज्यामुळे फक्त नुकसानच होणार. 
                काय करायचं अशा वेळी? नुसता त्रास करून घ्यायचा का? त्यापेक्षा असं काही करता येईल का ज्यामुळे आपल्याला हवं ते ध्येय साध्य होईल आणि कोणाला काही त्रासपण होणार नाही.
अशावेळी या इर्षेला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करायचा. मान्य करायचं की समोरच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आणि ते शक्यही नाही कारण प्रत्येक व्यक्ती unique असते. पण म्हणून रडत बसायचं का?  नाही. अशावेळी आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या आवडी काय आहेत याचा विचार करायचा. या सर्वाचा माझ्या इच्छित ध्येयासाठी कसा उपयोग होईल ते पाहायचं. असं केल्याने आपल्याला हवं ते सर्व मिळतं. किंबहुना त्यापेक्षा जास्त मिळतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे किती आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला आपल्या पद्धतीने आणि विशेषतः चांगल्या मार्गाने त्या गोष्टी कशा मिळवता येतील याचा विचार करावा. सर्व आपोआप मिळतं.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...