रिया खूपच दुखावली होती. रडत रडत तोंडाचा पट्टा तर एकसारखा चालूच होता. ' तो मला समजूनच घेत नाही, इतकी वर्ष आम्ही रिलेशन मध्ये आहोत, मी मात्र त्याच लगेच ऐकायचं, त्याला मात्र तस करता येत नाही. मी दर वेळी सांगते; अस वागू नको, असा राहू नको. पण नाही स्वतःला हवं तसच करायचं. मी काही अपेक्षा ठेवूच नये का त्याच्याकडून"? हा प्रश्न अर्थात मलाच विचारला गेला होता. विचार केला जरा वेगळ्या पद्धतीने त्यावर उत्तर देऊ. पण त्याआधी रियाला शांत करण गरजेचं होत. तिला शांत केलं, पाणी दिलं आणि ती जरा शांत झाल्यावर एक प्रश्न विचारला. "रिया जर तुझी मनस्थिती आता जरा ठीक झाली असेल तर मी तुला एक गोष्ट सांगू का? तू ऐकशील का"? ती म्हणाली, हो ऐकेन. चालेल ऐक तर मग! मी गोष्ट सांगायला सुरुवात केली. "एका गावात जत्रा चालू असते, पाळणे, खेळण्यांची दुकान सर्व काही छान मांडलेल असत. सर्व लहान मूल , मोठी माणसं फिरत, आनंद घेत असतात. ह्यात होत काय, एक मुलगा एका फुगेवल्याकडे बघतो. त्याच्याकडे एकच फुगा उरलेला असतो. त्याला तो खूप आवडतो आणि तो मनोमन देवाकडे प्रार्थना करतो की देव मला तो फुगा मिळुदे. इथे खर गंमत होते. तो ज्यावेळी अशी प्रार्थना करतो त्यावेळी अजून एक मुलगा तशीच प्रार्थना देवाकडे करतो की त्याला तो फुगा मिळू दे. फुगा तर एक आणि हवाय दोन मुलांना. तुला काय वाटतं रिया, देव काय करेल"? त्यावर रिया म्हणाली, "अग काय करणार, देव असला तरी फुगा एक म्हटल्यावर एकाच कोणालातरी मिळणार ना! एकाचीच इच्छा पूर्ण होणार". अगदी बरोबर रिया. देव असूनही तो एकावेळी दोघांची इच्छा पूर्ण करू शकला नाही. मग आपण सर्व तर माणसं आहोत. आपण कितपत अट्टाहास करायचा की समोरच्याने आपलं ऐकलंच पाहिजे. आपल्याला पाहिजे तस वागलच पाहिजे. तू त्याच्याकडून एखादी अपेक्षा ठेवते इतपत ठीक आहे परंतु त्याने अगदी तसच वागल पाहिजे अस म्हणणं योग्य आहे का?
यावर रिया म्हणाली, मला हळू हळू समजू लागलंय. त्याने माझ ऐकावं अशी माझी इच्छा असली तरी अस घडलच पाहिजे अस नाही, बरोबर ना!
अरे वा! तू तर खूपच हुशार झालीस ग. रिया हसून म्हणाली, "मग तुझ्यासारखी मैत्रीण आहे ना समजावायला".
Comments
Post a Comment