Skip to main content

बहर आयुष्याचा


आपण नर्सरी मध्ये जाऊन एक छान अस रोपट घेऊन येतो. त्याला घरी आणून मातीत रुजवतो. त्याची देखभाल करायला सुरू  करतो. पण अचानक काय होत कोण जाणे, त्याची वाढ ना हळूहळू खुंटायला लागते, हळू हळू पानांना बारीक छिद्र पडू लागतात, ती पांढरी होऊ लागतात. बारकाईने पाहिल्यावर आपल्या लक्षात येत की त्याला कीड लागली आहे. अश्यावेळी करायचं काय? इतक्या प्रेमाने आणलेलं झाड; जगवायला तर पाहिजे. म्हणून आपण कीटकनाशक, तसच वेगवेगळ्या औषधी पानांची रसायन करून ती झाडावर फवारायला लागतो. काय आश्चर्य? झाडावरची कीड हळूहळू नाहीशी होऊन झाड सुंदरपणे फुलतं आणि त्याची वाढ छान पद्धतीने होऊन ते बहरत.

       मित्रांनो, आपल्या आयुष्याचं पण ना असच असत. आपलं हे आयुष्य सुंदर झाडाप्रमाणे वाढत असत. परंतु अचानक कुठूनतरी एक नकारात्मक विचारांची कीड येते आणि आपल्या या आयुष्याला पोखरायला सुरू करते. ही कीड असते अतिरिक्त केलेल्या चिंतेची, ही कीड असते स्वतः ला सतत दोष लावण्याच्या सवयीची, ही कीड असते आयुष्यालाच चुकीच्या पद्धतीने पाहायची ज्यात आपण गुरफटून जातो आणि आपला विकास, आपली वाढ थांबते. 

       पण खरतर हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला या किडीवर उपयोगी, आरोग्यदायी अशा विचारांची फवारणी करण गरजेचं असत. मग हे विचार असतील परिस्थितिला नीट लक्षात घेऊन त्यावर काम करण्याचे, हे विचार असतील आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी तज्ज्ञाची मदत घेण्याचे, हे विचार असतील आपल्याला आहे तस स्वीकारून आपल्या चुकांवर काम करण्याचे ;त्यासाठी काम करण्याचे.

       सुरुवातीला कठीण जात पचवायला. पण आपल्या पुढच्या विकासासाठी हेच सर्व विचार आपल्याला कामी येतात. मग बहरवणार ना आपलं हे सुंदर आयुष्यरुपी झाड या थोड्या कडू पण खूप उपयोगी आणि आरोग्यदायी फवारणीने....



       

Comments