"अरे एक नवीन वेबसिरीज आलीय, खूप भारी आहे रे पण दर आठवड्याला फक्त एक एपिसोड, एक आठवडा थांबायचं, माझ्यात नाही बाबा इतके patience." "इतकंच ना, कश्याला टेन्शन घेतोस मी देतो तुला एक लिंक, त्यावरून सर्व एपिसोड डाउनलोड करता येतात. बघून टाक एकाचवेळी.... इतकं काय त्यात?" हे आहे आपलं आताचं आयुष्य. फोनच्या एका क्लिकवर चालणारं. काही हवं झालं ऑर्डरचं बटन दाबा, काही माहिती हवी लिंक क्लिक करा. काही शिकायचं आहे यूट्यूब आहे ना! आता या क्षणाला मला काहीतरी हवं आहे आणि त्यासाठी मला वाट पाहायला लागेल ही परिस्थिती आता कुठेतरी कमी होत चाललीये. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की प्रतीक्षा असायची ती गोळेवाल्याची, घंटीचा आवाज आला की आपण पैसे गोळा करून त्याची वाट पाहत बसायचो की कधी तो आपल्या घराजवळ येईल, या वाट पाहण्यात एक मजा होती, एक उत्सुकता होती. की आपल्याला यावेळी कोणता गोळा खायला मिळेल. आईकडून एक एक रुपया मिळाला तरी त्यातून काय घेऊ आणि काय नको असं व्हायचं. नवीन मुव्ही आलंय हे समजायचं ते फक्त थिएटरबाहेर लागलेल्या पोस्टर वरून आणि मग बाबांच्या मागे लागणं सुरू व्हायचं की आम्हाला ...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद