परंतु बरेचदा आपण त्यांच्यामध्ये ,त्यांच्या अस्तित्वामध्ये इतके गुंतत जातो की एका क्षणाला आपलं स्वतःच काही एक अस्तित्व आहे हेच आपल्याला पटत नाही.अर्थात यामध्ये इतरांचा प्रभावही तितकाच महत्वाचा ठरतो.तुला दुसरा आईनस्टाईन बनायचे आहे किंवा तुला दुसरा विवेकानंद व्हायचे आहे या गोष्टी मनावर इतक्या बिंबवल्या जातात की ते मूल स्वतःचे गुण ,दोष,आवडी-निवडी सर्व विसरुन एका वेगळया अस्तित्वामध्ये स्वतःला ढाळण्याचा प्रयत्न करते.परिणामी स्वतःकडून इतरांच्या व स्वतःच्या अपेक्षा खूप वाढतात . ज्या पूर्ण झाल्या तरी आपण स्वतःला कुठेतरी गमावलेलं असतं आणि अपूर्ण राहिल्या तर आपण आतून पूर्णपणे तुटतो....
त्यामुळे मला दुसरा आईनस्टाईन व्हायचयं याचा विचार न करता त्याचे विचार समजून घेऊन मला लोकांचा आदर्श कसा होता येईल याचा विचार करा आणि लोकांचा आदर्श होण्यासाठी कोणाची copy करण्याची गरज नसते.
गरज असते त्यांची inspiration घेऊन स्वतःला घडविण्याची.
त्यामुळे आदर्श असावेत ,परंतु घडवण्यासाठी स्वतःच अस्तित्व संपविण्यासाठी नाही...

Chhan kavya .👌👌👌👌
ReplyDeleteThnk u for reply
ReplyDeleteअगदी योग्य पद्धतीने विचार करते आहेस आणि मांडतही आहेस. स्पष्ट , स्वच्छ.
ReplyDeleteThnk u
ReplyDeleteNice thought kavya .
ReplyDeleteVery good 👌👌👌😀😀
Nice kavya👌
ReplyDelete