Skip to main content

तुमच्या आतल्या देवाला ओळखा .....

माणसाला  खूप श्रद्धाळू ,समाजशील असे नेहमी मानले जाते. असा हा माणूस आपल्या जीवनात नेहमी कोणाच्या तरी आधारावर जगत असतो.मग त्याला आपण सोबत म्हणू ,अवलंबन म्हणू किंवा श्रद्धा म्हणू.श्रद्धा! किती मोठा शब्द आहे ना हा! कोणाकोणावर असते आपली श्रद्धा ? आई वडील, मित्र मैत्रिणी, शिक्षक आणि एक महत्वाचं राहिलचं की ,देव!
                   किती contraversial शब्द आहे ना हा. एकीकडे जीव देतो तर दुसरीकडे जीव घ्यायला लावतो.का होत असं? कुठे लिहिलयं का देवाने हे मागितलं ,जवळ येऊ नको म्हटलं,दुसरयाला मार म्हटलं .विचार केला का कधी यावर ?केला नसेल तर करा.असं यामुळे होत कारण आपण या देवाला ,या श्रद्धेला बाहेर शोधायचा प्रयत्न करतो आयुष्यभर.आता ही एक बाजू झाली देवाबद्दलची,त्याच्या श्रद्धेबद्दलची. जी आपल्याला ताकद देते.याप्रमाणेच दुसरी एक बाजू आहे भूत या संकल्पनेबाबतची जी आपल्याला घाबरवून सोडते ,कमजोर करून टाकते . माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचं भूत होत आणि ते दिसतं अस म्हणतात. बरीच लोक आम्ही अनुभवलयं असही म्हणतात .माफ करा पण मी ना कधी देवाला प्रत्यक्ष पाहिलय ना कधी भुताचा अनुभव घेतलाय आणि मला वाटतही नाही आयुष्यात पुढे कधी घेईन.
                      कारण  मी या दोन्ही गोष्टी बाहेर शोधायचा कधी प्रयत्नच केला नाही.तुम्ही विचार करा ना एखादी व्यक्ती अशा ठिकाणाहून जिथे भूत आहे असे म्हटले जाते ज्याची तिला कल्पना नसते तेव्हा ती व्यवस्थित असते काहीही होत नाही .परंतु नंतर कुणीतरी सांगितल्यावरचं तिला कापरं भरण्याचं ,आजारी पडण्याचं काय कारण आहे? काय असत हे?खरचं कोणत्या भूताचं काम असतं का? नाही! हा विचारांचा प्रभाव असतो जो मनावर ठसवला जातो.
                       बरयाचदा एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिचा भास होतो अस म्हणतात. साहाजिक आहे जिच्यासोबत आयुष्य काढलं ती जरी एका क्षणात निघून गेली तरी तिच्या आठवणी,अस्तित्व निघून जाणं कसं शक्य आहे? मनात ज्या आठवणींच प्रतिबिंब आहे ते धूसर स्वरूपात का असेना डोळंयाना दिसणारच ना! परंतु आपण याला भूत, प्रेत ,आत्मा यासारखी नाव देऊन नको ते उपाय करू लागतो.
                         या दोन्ही बाजू ज्या आपण आयुष्यभर बाहेर पाहत राहतो ,शोधत राहतो कधी स्वतःमध्ये शोधायचा प्रयत्न केलाय का? तुम्ही जर  तसा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला फरक नाही पडणार समोरची व्यक्ती देव मानते का नाही किंवा तुम्हाला देवाचे दर्शन मिळाल का नाही.फरक नाही पडणार समोरचा रस्ता भुताचा आहे की नाही या गोष्टीने .
                          या दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये आहेत .जेव्हा आपण दुसरयाला मदत करतो,जीव वाचवतो ते आपल दैवत्व असतं.आपले सकारात्मक विचार ज्यामुळे आपण यशस्वी वाटचाल करतो ते आपल दैवत्व असतं आणि आपण जेव्हा व्देष ,मत्सर,भिती या भावनांनी पेटलेले असतो तेव्हा आपल्यातील भूत बाहेर आलेले असते.
                           त्यामुळे श्रद्धा असावी जरुर असावी परंतु आयुष्यात उंचावणारी  आणि ते शक्य आहे जेव्हा तुम्ही आतल्या देवाला ओळखाल......











                                                





                   
             

    





Comments

  1. शब्दांकन आणि जरा स्पष्ट हवं सुरुवातीला नीट लक्षात येत नाही पण प्रयत्न खूपच सुंदर आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...