स्वरुपा, स्वरुपा पेठे. तिला पहिल्यापासून खाण्याची खूप आवड. ज्याला आपण फुडी म्हणतो ना तस. तर अशी ही स्वरुपा फुडी होती. जेवणात अमुक एक पदार्थ पाहिजे किंवा अमुक एक गोष्ट मला आवडतच नाही असं तिच नव्हत. तिला सर्व प्रकारचं खाण खायला आवडायचं. नवनवीन पदार्थ explore करायला तिला आवडायचं. तिचा हा स्वभाव सर्वांना माहीत होता. त्यामुळे पार्टी असुदे किंवा कुठे सहज म्हणून खायला जायचं असेल सर्व जण तिला नक्की बोलवायचे. आग्रह करून खायला घालायचे.शेवटी खाण बनवणाऱ्याला कोणतरी खवय्या मिळाला तर आनंदच होतो. ती सुद्धा कोणाला कधी नाही म्हणत नव्हती.
आता सर्व खात होती म्हटल्यावर त्यात तेलकट, तुपकट, जंक फूड या सर्व गोष्टी पण आल्याच. हे असं एकसारखं खाल्ल्याने स्वरूपाचं वजन जरा वाढलं होत. तिच तिला ते जाणवू लागलं. म्हणून तिने ठरवलं की आपलं बाहेरच खाण असेल किंवा वेळी अवेळी खाण असेल जरा आटोक्यात आणायचं. त्यासाठी प्लॅन करायचा. सोबत व्यायाम ही होताच. आता ही ठरली फूडी मुलगी. त्यामुळे या सर्व गोष्टी कमी करण तिला जरा अवघडच वाटत होत. पण स्वतःच्या आरोग्याचा विचार करता तिला थोडे दिवस तरी हे टाळायला लागणार होत. त्यामुळे तिने कशीबशी मनाची तयारी केली.
पण त्यात खंड पडला जेव्हा तिला पार्टी साठी बोलावण आलं. कधीही कोणाला नाही न म्हणणारी मुलगी आता तरी कशी म्हणेल. तिथे जाऊन अगदी थोडंसं खाऊन आपण येऊ असा विचार करून ती गेली. पण तो विचारच राहिला. आणि नेहमीप्रमाणे मस्त सर्व छान छान पदार्थांवर ताव मारून आली. असं किमान दोन तीनदा तरी झालं. कारण दर वेळी कोणतरी बोलवत असे किंवा काहीतरी फंक्शन असे. हिचा प्रॉब्लेम हा होत होता की हिला नाही म्हणता येत नव्हत. कारण तस काही म्हटल तर समोरचा माणूस दुखावण्याची भीती. तरी तिने एकदा तिच्या प्लॅन बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही त्याला सिरियसली घेतल नाही. पण आता हे दोन तीनदा झाल्यामुळे तिला वाईट वाटू लागलं. आपण वजन कमी करायचं ठरवत आहोत आणि तरी आपल्याकडून ते नीट होत नाही याचं तिला दुःख होत होत. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर लोकांना नाही तरी कस म्हणणार? त्यांचा अपमान केल्यासारखा होईल. काही दिवस मनाची अशी चलबिचल झाल्यावर मात्र तिने ठरवलं की आता काहीही झालं तरी आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. कोणी कितीही आग्रह केला तरी मोजक जेवढं गरजेचं आहे तेवढं खायचं.
आता ह ठामपणा आजमवायची वेळही आली. तिच्या एका मैत्रिणीने घरी पार्टी ठेवली होती व तिलाही बोलवलं होत. स्वरूपाने तिच्या प्लॅन मध्ये होत अगदी तेवढं जेवण घेतल व ती जेवली. तेवढ्यात मैत्रीण जवळ येऊन तिला अजून घ्यायला आग्रह करू लागली. पण स्वरूपाने अगदी नम्र भाषेत तिला ती अजून घेणार नाही असं सांगितलं. मैत्रीण दोन तीनदा आग्रह केला व ती दुसऱ्या पाहुण्यांकडे निघून गेली. स्वरूपाने कधी कुणाला नाही म्हटलं नव्हतं. त्यामुळे आज असा ठामपणा दाखवून तिने छोटासा का होईना विजय मिळवला. त्याचा तिला आनंद झाला. तिचा हाच ठामपणा तिने काही दिवस लागू ठेवला आणि गंमत म्हणजे तिला जे वाटत होतं की लोकं आपल्यावर रागावतील, दुखावतील तर त्याची खात्री करायला तिने एक दोघांना विचारलं देखील आणि थोडाफार आपल्या वागण्याचा स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला पण ती लोक तो प्रसंग विसरली होती. कोणाच्याही मनात तिच्याबद्दल रुसवा वगैरे नव्हता. काही जणांनी तिच्या निर्णयच कौतुक देखील केलं. हे सर्व पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की आपण आधीच एखाद्या गोष्टीबद्दल अंदाज लावून मोकळे होतो जे खरे होतीलच असे नाही आणि त्याचबरोबर जर एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर नाही म्हणणं ही योग्य ठरत. फक्त आपण आपल्या निर्णयावर ठाम असावं लागत. जेवढ आपण ठाम राहू लोकही ते मान्य करू लागतात.
स्वरूपाप्रमाणे आपणही अनेक गोष्टी ठरवत असतो. या गोष्टी ठरवताना आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो काही गोष्टींना नाही म्हणावं लागतं अशा वेळी लोकांना दुखावलं जाईल, नाराज होतील असा विचार करून आपण भीड बाळगतो आणि ठरवलेलं मागे पडत. म्हणूनच आपलं दीर्घकालीन धेय्य लक्षात ठेवायचं आणि त्यासाठी कधी आपल्याला नाही म्हणावं लागत असेल तर ते चुकीचं नाही. त्याचे फायदे आपल्याला नंतर दिसतात.
काव्या धनंजय गगनग्रास
एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र
Comments
Post a Comment