Skip to main content

सब्र करो!!!

1972मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधील प्रोफेसर मानसशास्त्रज्ञ Walter mischel यांनी लहान मुलांवर एक प्रयोग केला. ज्याचे नाव होते "marshmallow experiment". हा प्रयोग delayed gratification. म्हणजेच नंतर मिळणार समाधान किंवा आनंद यावर आधारलेला होता. यामध्ये लहान मुलांसमोर एक marshmello ठेवली होती व त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही ही marshmello खाऊ शकता पण जर तुम्ही थोडा वेळ थांबलात तर यासोबतच अजून एक marshmello मिळेल. असं सांगून ते निघून गेले. काही वेळानं आत आल्यावर अस दिसल की काही जणांनी marshmello खाली होती व काहीजण तसेच बसले होते. जेव्हा या मुलांचा भविष्यात आढावा घेण्यात आला तेव्हा अस दिसून आल की  जी मुलं थांबली नव्हती त्यांच्या तुलनेत जी मुलं थांबली होती त्यांनी पुढच्या आयुष्यात चांगली कामगिरी केली होती. 

तर काय आहे *delyed gratification?* delyed gratification म्हणजे पुढील किंवा भविष्यातील मोठ्या आनंदासाठी आताच्या तात्पुरत्या आनंदकडे दुर्लक्ष करणे. लांबचा आनंद मिळवण्यासाठी वाट पाहणे. पण हे सर्वांना जमत अस नाही. आपल्या रोजच्या जीवनात पण हे होत असत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला हे दिसून येईल. बऱ्याच जणांना हातात पैसा आला की खर्च करायची सवय असते. अडचणीच्या वेळी त्याचा उपयोग होऊ शकतो त्यासाठी आपण ते साठवले पाहिजेत हे अशी लोक लक्षात घेत नाहीत. तेवढा संयम त्यांच्यात नसतो. आता त्यातून मिळणारा आनंद त्यांना जास्त महत्त्वाचा वाटत असतो. चालढकलपणा मध्येही हे दिसून येत. यात माणूस जास्त महत्त्वाचं काम टाळून कमी महत्वाचं क्षणिक आनंद देणारे काम करण्यात गुंतून जातो. जसं की रोज लवकर उठून व्यायाम केला तर नंतर त्याचे चांगले परिणाम दिसतील हे माहीत असत. परंतु आताच्या झोपेचा आनंद त्यांना घालवायचा नसतो. तेवढं थांबायची त्यांची तयारी नसते. परीक्षा आली तर खेळत राहणे, आरोग्याकडे लक्ष न देता आता तोंडाला चांगल लागत म्हणून खाणे, पथ्य न पाळणे ही सर्व पुढच्या पण मोठ्या समाधानाकडे दुर्लक्ष करण्याची उदाहरण आहेत. यातून अता जरी आपल्याला आनंद मिळत असेल तरी तो फार काळ राहतं नाही. म्हणून delyed gratification याला महत्त्व आहे. यातून व्यक्ती संयम कसा राखावा हे शिकते. Self regulation वाढत. जरी आता थोडाफार त्रास होत असला तरी याचे नंतर दीर्घकालीन फायदे आहेत याची जाणीव होते. Impulse control वाढतो. बऱ्याचदा चिंता, चालढकलापणा यामध्ये टाळण्याचा प्रयत्न जास्त असतो. इथे delyed gratification चा फायदा होतो. 

म्हणून जर आपल्याला पुढच्या पण मोठ्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल, ते समाधान हवं असेल तर आता दिसणाऱ्या क्षणिक सुखाला हुरळून न जाता थोड थांबलं पाहिजे आणि हे स्पष्ट करणारी हिंदी मधील याहून चांगली म्हण असू शकत नाही.😊😊

"सब्र का फल मिठा होता है...."


काव्या धनंजय गगनग्रास

एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र



Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...