Skip to main content

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू आणि मस्त पण राहू.


१. बागकाम: जितकं आपण निसर्गाशी जोडलेले राहू, तितके आपण निरोगी आणि आनंदी राहतो. नुसतं झाडांकडे पाहून देखील मन प्रसन्न होतं. याशिवाय झाड लावल्याने, त्यांचं पालन पोषण केल्याने काहीतरी मिळवल्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. Happy hormones स्त्रवतात. शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. शिवाय जी झाड आपण लावतो त्याचेही अनेक फायदे होतात.

२. घरातल्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे : आता ज्याच्या त्याच्या हातात फोन असतो. त्यामुळे घरातल्या घरात प्रत्येकाचं विश्वच वेगळं झालं आहे. पण याने नात्यांमध्ये दुरावा होत आहे. असं व्हायला नको असेल तर आपल्या घरतल्यासोबत वेळ घालवला पाहिजे, त्यात व्यस्त राहिलं पाहिजे. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारणं, दिवसभरात काय काय झालं हे सांगणं, जोक्स, काय प्रोब्लेम असतील तर ते सांगणं याने नात्यामधली बांधिलीकी टिकून राहते आणि एकटेपणाची भावना येत नाही.

३. मित्र, मैत्रिणी : चांगली मैत्री आपल्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव पाडते. कारण बरेचदा ज्या गोष्टी आपण आपल्या घरातल्या माणसांसोबत शेअर करत नाही ते आपल्या मित्र मैत्रीणीना सांगतो, त्यांच्याकडे आपण मन मोकळं करतो. त्यांचं आपल्या सोबत असणंच आपल्याला खूप आधार देऊन जातं. आपल्या कामामुळे आपल्या दर वेळी वेळ आपल्या मित्रांसोबत वेळ घालवण शक्य होत नसलं तरी जेव्हा होईल तेव्हा त्यांच्यासोबत फिरायला जाणे, फोनवर बोलणे, मूव्ही पाहणे हे आपण करू शकतो.

४. वाचन : कितीही गेम्स येऊदेत, करमणुकीची विविध साधने येऊदे, वाचन ही अशी गोष्ट आहे जी कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. म्हणूनच तर आताच्या काळात डिजिटलीसुद्धा खूप चांगल्या पुस्तकांचा संग्रह आपण वाचू शकतो. चांगलं वाचन आपल्याला समृध्द करतं, आपल्याला दिशा दाखवते. कारण शब्दांची तेवढी ताकद असते. म्हणून चांगली चांगली पुस्तके वाचणे, त्यातून काहीतरी शिकणे आणि त्यात व्यस्त राहणे फायदेशीर आहे.

५. फिरणे: फिरणे, चांगल्या चांगल्या जागांना भेटी देणे हा अनुभव आपल्याला आतून बदलून टाकणारा आहे. कारण ह्या प्रवासातच आपण इतक्या नाव नवीन गोष्टी शिकतो, अनुभवतो जे आपण घरात बसून नाही घेऊ शकत. म्हणून प्रवास करणे, त्यात व्यस्त राहणे कधीही आपल्या मानसिक आरोग्याला चांगले आहे.



Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...