Skip to main content

तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या कृतींवर होतो !

     अनेकदा असं होतं की आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात. त्यासाठी लागणारी पुरेशी क्षमता आपल्याकडे असते.तरीही आपल्याला त्या गोष्टी काही केल्या जमत नाहीत आणि या न जमण्याची आपण कळत नकळत खूप कारणे शोधून काढतो. मग त्यामध्ये परिस्थिती कशी अनुकूल नव्हती , साधने कशी उपलब्ध नव्हती, माझी क्षमता कमी पडली आणि सर्वात महत्वाचे ती गोष्ट करायची माझी पात्रता नाही.                                                                     इथून खरया अर्थाने विचार आणि कृतींच्या खेळाला सुरुवात होते.जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हा आपल्या लक्षात येते की जी कारणे आपण देत होतो परिस्थितीची ,साधनांची ,क्षमतांची ती सर्व आपण स्वतः निर्माण केलेली असतात. जेव्हा आपण म्हणतो अमुक एक गोष्ट करायची माझी पात्रता नाही ,तेव्हा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या गोष्टी करायला अजुन सुरुवातच केली नाही त्यासाठी लागणारी पात्रता आहे की नाही हे ठरवलं कसं ?  हे फक्त दोनच शक्यतांमुळे होऊ शकते जेव्हा खरचं क्षमता नसते किंवा दुसरयांच्या बोलण्याचा किंवा विचारांचा आपल्यावर झालेला परिणाम .एखादी गोष्ट करताना आजूबाजूच्या लोकांकडून म्हटलं जात की का करताय ,तुम्हाला जमेल का ? सातत्याने या गोष्टी ऐकल्यावर एका टप्यावर वाटतं की  खरच आपल्यासाठी हे  नाही .या एका विचारासरशी पुढे अनेक नकारात्मक विचारांचे जाळे निर्माण होते आणि काहीतरी  करण्यासाठी ज्या कल्पना सुचाव्या लागतात त्यांचा मार्ग बंद केला जातो .परिणामी आलेल्या संधी ,त्यासाठी लागणारी परिस्थिती सर्व असूनही आपल्याला काही करता येत नाही.
            याउलट जेव्हा आपल्याला आपल्या क्षमतांची पुरेपूर जाणीव असते दुसरयांच्या विचारांचा फारसा प्रभाव पडत नाही तेव्हा आपण आपल्या विचारांना खुली वाट करून देतो, नवनवीन कल्पना सुचतात ,संधी शोधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात आणि परिस्थिती सुद्धा अनुकूल बनते.
             त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही तेव्हा एकदा विचार करा कि हे बाहेरच्या घटकांमुळे घडले कि आपल्या विचारांमुळे.कारण आपल्या विचारांचा परिणाम आपल्या कृतींवर होत असतो ....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...