Skip to main content

स्वातंत्र्य विचारांचे


राजाराम हा एक साधा गिरणी कामगार. रोजच्या वेळात गिरणीत जाणे, दिलेलं काम करणे आणि घरी येणे. घरात त्याची बायको व दोन मुले असा त्याचा परिवार होता. प्रकाश १२वर्षांचा तर दीपक १०वर्षांचा. घरची परिस्थिती काही फार चांगली नव्हती. त्यात राजाराम मिळालेला अर्धा पगार दारू पिण्यातच घालवत असे. दारू पिऊन आल्यावर मग घरी बायकोसोबत होणारी भांडणे, तिला शिवीगाळ करणे, मुलांवर रागावणे हे सर्व नेहमीच झालं होत. दोन्ही मुलं याच वातावरणात वाढली. यातूनच दोघांचे शिक्षण चालू होते. प्रकाशला मुळातच शिक्षणाची कमी आवड; त्यात घरची परिस्थिती अशी असल्याने त्याला सांगायला नेहमी एक कारण मिळायचे की कशी आमची परिस्थिती चांगली नाही. कसं मला सारखं adjust करावं लागत वगैरे. अशी कारण सांगतच त्याने कसेबसे १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व तो वडिलांच्या जागी नंतर गिरणीत कामाला लागला. त्यालाही बरीच व्यसन लागली होती.

 दीपक मात्र याउलट होता. लहानपणापासून शिक्षणाची आवड. त्यात वडिलांचे वागणे, आईची होणारी घुसमट हे सर्व त्याला दिसत होते. त्याच वेळी त्याने ठरवले की खूप शिकायचे आणि सर्वांना सुखात ठेवायचे. त्याप्रमाणे त्याने खूप प्रयत्न करून यश मिळवले व शेवटी पदवीच्या परीक्षेत तो विद्यापीठात प्रथम आला. बक्षीस वितरण सोहळ्यात  त्याला त्याच्या घरा विषयी, परिस्थितीविषयी प्रश्न विचारले. त्यातून असा प्रश्नही आला की एका घरात वाढून पण भावाने गिरणी कामगार व्हावे आणि तुम्ही विद्यापीठात नंबर काढावा अस कस झालं? यावर दीपकने खूप छान उत्तर दिले. " हे खरे आहे की आम्ही एका घरात वाढलो आमची परिस्थिती एक होती. परंतु एक गोष्ट वेगळी होती ती म्हणजे आमचे विचार, विचार करण्याची निवड. माझ्या भावाने प्रत्येक वेळी adjust करावे लागते असे सांगून कमी कष्ट करून आहे त्यात राहण्याची निवड केली आणि मी  परिस्थितीवर मात करून, मेहनत करून पुढे जायची निवड केली आणि म्हणून मी आज इथे आहे.  

आपण सर्वजण कधी ना कधीतरी अश्या परिस्थितीतून गेलेलो असतो. परंतु  सतत कसे मी adjust करत आहे अस सांगून त्यातच अडकून राहायचे की त्यातून बाहेर पडून पुढे वाटचाल करायची याची निवड करण्याचे स्वातंत्र्य  आपल्या विचारांमध्ये असते. कारण आपल्याकडून कोणतीही गोष्ट हिरावून घेतली जाऊ शकते. परंतु एखाद्या परिस्थितीमध्ये कसा विचार करावा हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. विचारांची निवड करण्याचे स्वातंत्र्य नेहमी अबाधित राहते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...