सुमन खूप वैतागली होती. तिची चिडचिड होत होती. त्याच कारणही तसच होत म्हणा. तिचा ८ वर्षाचा मुलगा अनय, तिने सांगितलेली कोणतीही गोष्टी कधी नीट ऐकत नसे. त्याला ओरडून, रागावून, प्रेमाने समजावून झाल पण परत पहिले पाढे पंचावन्न. एक दिवस ती सहज तिच्या मैत्रिणी च्या, वर्षाच्या घरी गेली. दारावर असताना सुमनच्या कानावर वर्षाचं आणि तिच्या मुलाचं बोलण आलं. "अरे वा! राज, very good! पसारा होऊ नये म्हणून तू ही सर्व खेळणी नीट एकत्र करून ठेवलीस हे खूप चांगलं केलं. आता अजून एक छोटं काम करशील का ? जशी तू ही सर्व खेळणी एकत्र करून ठेवली तशीच ती आत तुझ्या रूममध्ये ठेवशील? म्हणजे ती हरवणार नाहीत आणि पुढच्या वेळी तुला लगेच मिळतील"- वर्षा. " हो आई, लगेच ठेवतो" - राज.
बाहेरून सुमन हे सर्व ऐकत होती. ती आत आली व वर्षाला म्हणाली, "वर्षा अग तुझा मुलगा किती गुणी आहे. तू सांगितलेलं लगेच ऐकतो. नाहीतर माझा अनय, माझी एक गोष्ट ऐकत नाही". वर्षाला सुमनचा हा प्रॉब्लेम माहीत होता. तिने सुमन ला तिथेच बसायला सांगितले व ती आत गेली. थोड्या वेळाने ती पाणी घेऊन आली व सुमनला म्हणाली, सुमन तुझा हात पुढे कर आणि हे पाणी घेऊन मुठ बंद कर. बरं त्यातून पाणी जराही पडू देऊ नकोस. सुमन ला तिचे बोलणे विचित्र वाटले. तरी तिने तसे केले. मग वर्षाने विचारले, सांग बर, काय झालं? "अग काय होणार, पाणी कधी मुठीत घट्ट धरल्यावर राहील का ? पडणारच ना ते!" सुमन.
अगदी बरोबर! आपली मुलं पण पाण्यासारखी असतात. त्यांना तू जितकं घट्ट धरू पाहशील तितकीच ती हातातून निसटणार. म्हणून अशावेळी, आपण जसं हळुवार ओंजळीत पाणी घेतो त्याच प्रमाणे मुलांना कंट्रोल न करता त्यांच्या कलाने घेऊन बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतात. "म्हणजे, ते कसं करायचं"? सुमन.
म्हणजे तू जस अनयला प्रत्येक गोष्टीमध्ये तू असच कर ,तसच कर. खेळायला बाहेर जाऊच नको, इतका वेळ फक्त अभ्यासच करायचा अस कंट्रोल करायला पाहतेस त्याने काही फायदा होतो का ? तर नाही . उलट तो अधिकच वेगळं वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अश्या वेळी कंट्रोल न करता, त्याला तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगून करायला लावायची. ती कशी तर त्या गोष्टीचे फायदे, तोटे तू सांगू शकतेस, तसच त्याने एखाद चांगलं काम केलं तर तू त्याच कौतुक करू शकतेस, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धती वापरून तू त्याला गोष्टी सांगू शकतेस. यातून तुझा त्याच्यावर चांगला प्रभाव पडेल आणि तो तुझी सांगितलेली काम करण्याची शक्यताही वाढेल.
हे सर्व ऐकुन सुमनला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. ती घरी निघाली होती परंतु अनयला कंट्रोल करण्याच्या विचारात नसून त्याला प्रभावित करण्याच्या..
Comments
Post a Comment