Skip to main content

स्थितीस्थापकत्व

विजय आणि प्रकाश हे दोन शेजारी शेजारी. दोघंही नदीकाठी राहत होते. एके वर्षी खूप जोराचा पाऊस पडून पुर आला व त्यात दोघांच्याही घरामध्ये पाणी आलं. त्यांचा बरच नुकसान देखील झालं. पूर खूपच भयानक होता त्यामुळे नुसत पाणी घरात येऊन थांबल नाही तर घराचा काही हिस्सा पण खराब झाला, उन्मळून पडला. जे काही कष्टाने मिळवलं होत सर्व पाण्यातून वाहून गेलं. दोघांनाही या गोष्टीचा धक्का बसला.

पण काही काळाने प्रकाशने पुन्हा कष्ट करून सर्व काही उभारल व नव्याने सर्व निर्माण करून तो  मूळपदावर आला. विजयला मात्र ते जमले नाही. तो आधीच्याच दुःखात अडकून राहिला.

दोघंही एकाच त्रासात असूनही फक्त प्रकाश त्यातून कसा बाहेर पडू शकला ...?  तर त्याचं कारण आहे त्यामध्ये असणारी स्थितिस्थापकत्वाची क्षमता.

स्थितिस्थापकत्व म्हणजे आलेल्या संकटांना, समस्यांना सामोरे जाऊन त्यातून धडा घेऊन परत नव्या उमेदीने जगणे, त्या समस्येमध्ये अडकून न राहता त्यातून बाहेर पडून पुन्हा मुळ पदावर येणे.

रबर जसा कितीही ताणला तरी परत स्वतःचा आहे तो आकार घेतो तसच ह्या व्यक्ती आलेल्या संकटाना खंबिरपणे सामोरे जाऊन पुन्हा नवीन सुरुवात करतात. ज्याला bounce back ability असेही म्हणतात.

स्थितिस्थापकत्वाचे जपान हुन चांगले उदाहरण असू शकणार नाही. हिरोशिमा आणि नागासाकी येथे जो अणुबॉम्ब हल्ला झाला त्यात ती दोन्ही शहरे उध्वस्त झाली. इतकी की त्यानंतर अनेक वर्ष तेथील लोकांनी यांचे परिणाम भोगले. तरीही ही दोन्ही शहरे पुन्हा नव्याने उभी राहिली आणि आज तो जगात एक विकसित देश म्हणून ओळखला जातो.

आपण बरेचदा संकट आल्यावर खचून जातो. पण असे न करता त्यातून धडा घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे. तर आपला विकास होऊ शकतो.


काव्या धनंजय गगनग्रास.  (एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...