चिराग खूप निराश, हताश झाला होता. त्याला समजत नव्हत त्याच कुठे आणि काय चुकत आहे. झालं असं की चिराग दरवेळी ठरवायचा किंबहुना वचन द्यायचा की आपण परीक्षेचं नीट रुटीन बसवायचं, चांगला अभ्यास करायचा. पण दर वेळी त्याच सर्व टायमिंग उलट सुलट व्हायचं आणि तो अभ्यास पुढे ढकलून त्यावेळी काहीतरी वेगळंच करत बसायचा. परिणामी आयत्या वेळी जसा होईल, जेवढा होईल तेवढा अभ्यास करून तो परीक्षा द्यायचा. याचा अर्थात त्याच्या मार्क्स वर पण परिणाम होत होता. बरं अस एका परीक्षेच्या वेळी नाही तर प्रत्येक परीक्षेच्या वेळी व्हायचं. त्याला प्रश्न पडायचा आपल्याला अभ्यासाचं महत्त्व आहे, इच्छा आहे तरी अस का होत?
कॉलेज मध्ये शिकत असताना आपल्या अनेकांच्या बाबतीत हे झालेलं असत. आपल्या सर्वांनाच नीट अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे असतात. पण ते होत नाही. काही ना कारणाने आपण अभ्यास पुढे ढकलतो आणि एकसारखं अस झाल्याने नंतर आपल्याला निराशा यायला लागते. पण चिराग सारखं अनेकदा कारणच समजत नाही.
काय बर असेल याच कारण? तर ते आहे जी गोष्ट करायची ठेवलेली असते त्याच चांगलं detailed planning नसणे. यामुळेच आपण कळत नकळत त्या गोष्टीचा चालढकलपणा करू लागतो. चालढकलपणाच्या या प्रकाराला promisary note procrastination असे म्हणतात.
ज्यामधे व्यक्ती एखादी गोष्ट कऱ्याच ठरवते.जी गोष्ट करणार त्याचे महत्त्व असते परंतु प्लॅनिंग नसल्याने चालधकलपणा होतो. इथे खरतर आपण जी गोष्ट करायची ठरवतो त्याच नीट प्लॅनिंग करण आवश्यक असत. जस की चिराग ला जर अभ्यासाचं रूटीन बसवायचं असेल तर दिवसातील किती तास, कोणत्या वेळी, तो अभ्यास करणार. त्यानुसार बाकीच्या कामाच्या वेळा ठरवणे जस की जेवण, घरातील माणसांसोबत वेळ घालवणे बाकीची काम इत्यादी. परीक्षेच्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास आधी करायचा त्याला किती वेळ द्यायचा हे सर्व बारीक प्लॅनिंग आधी करावं लागणार.
ज्या वेळी एखाद्या गोष्टीचं पूर्वनियोजन केलं जातं तेव्हा आयत्या वेळी करताना येतो तसा ताण आपल्याला येत नाही आणि आपण आधीच सर्व ठरवलेलं असल्याने त्या वेळेत शक्यतो आपण दुसर काही काम करत नाही. साहजिक चालढकल पणा कमी होतो आणि आपल्याला निराशा ही येत नाही.
- काव्या धनंजय गगनग्रास. (एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
Khup chan sangitle ahe chaldhakal Pana Baddal
ReplyDeleteThank u
Delete