रोजच्या प्रमाणे मी आणि माझा मित्र कामावर चाललो होतो. आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. त्यामुळे जाणं येणं पण एकत्रच व्हायचं. रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे, आजूबाजूच्या गोष्टींना पाहत कामावर जाताना रस्ता कधी संपायचा हे समजायचं नाही. रस्त्यावर जाताना एक जोडप नेहमी दिसायचं. अगरबत्ती, कापूर अस काही ना काही ते विकत बसायचे. दुर्दैवाने त्यांना डोळे नव्हते. पण त्यांच्या जिद्दीची आणि कष्टाची कमाल वाटायची.
एक दिवस जाताना मी त्यांना पाहिलं व तिथे कापूर घेण्यासाठी थांबलो. मला हवा होता तितका कापूर मी विकत घेतला. त्याचे २०रुपये होत होते. तितके मी त्यांना दिले व धन्यवाद म्हणून तिथून निघालो. नेहमीसारख मित्र सोबत होताच. तो मला म्हणाला, अरे त्या बिचाऱ्या दोघांना दिसत नाही. तु काही पैसे अजून दिले असते तरी चालल असत. त्यांना पण मदत झाली असती.
यावर मी म्हणालो, मित्रा जास्त पैसे द्यायला मला काहीही अडचण नव्हती. पण तू एक गोष्ट पहिली का? ते पाहू शकत नाहीत हे त्या दोघांना माहीत आहे. तरीही ते या वस्तू विकत आहेत. कारण त्यांना कोणाची फुकट मदत नकोय. त्यांना स्वतःच्या कष्टाने पैसे मिळवायचे आहेत. त्यामुळे अश्या माणसांच्या स्वाभिमानाला दुखावून मला त्यांना पैसे द्यायचे नव्हते.
थोडक्यात काय तर समोरच्याच्या दुःखा मध्ये फक्त वाहवत जायचं नाही. त्याच्या नजरेने सर्व अनुभव घेऊन त्यानुसार वागायचं. तू पण माझ्याच विचाराचा झालास ना रे! मी हसून म्हणालो आणि आम्ही जवळ आलेल्या आमच्या ऑफिसमध्ये गेलो.
- काव्या गगनग्रास (एम. ए. समुपदेशन मानसशास्त्र)
अप्रतिम आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक प्रकारची माणसे भेटतात त्यात एक त्यामधले असलेले एक सुंदर उदाहरण स्वाभिमानाचं आणि अभिमानच 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteThank u
Delete