Skip to main content

गुरूपौर्णिमा


गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः

ज्ञानरूपी अमृत देऊन, एका मातीच्या कच्च्या गोळ्याला सुबक मूर्तीचा आकार देण्याचं काम जो करतो तो म्हणजे गुरू. आपलं अख्ख आयुष्य घडविण्यात आपल्या गुरूचा खूप मोठा वाटा आहे. योग्य वेळी, योग्य वयात मिळालेला गुरू आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन जातो आणि याच गुरूचा सन्मान करण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. 

आपले आई वडील, शिक्षक यांना आपण अनेकदा गुरू म्हणून केंद्रस्थानी मानतो जे खरं आहे. आपल्या आयुष्याला आकार देण्यात सर्वात मोलाचा वाटा यांचा असतो. पण याव्यतिरिक्त देखील असे गुरू आपल्या आयुष्यात येऊन जातात, जे आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि ज्यांच्याकडून आपण डोळसपणे शिकलं पाहिजे.

१. अनुभव: कोणी कितीही काहीही शिकवलं तरी अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरू आहे. जे आपण आपल्या अनुभवांमधून शिकतो ते आपल्याला कोणीही हात धरून शिकवू शकत नाही. फक्त हे शिक्षण तेव्हाच घेता येत जेव्हा आपण त्या अनुभवांना डोळसपणे, तटस्थपणे पाहायला शिकतो. एकदा ठेच लागली की पुन्हा जाताना काळजी घेणे ही शिकवण अनुभवानेच मिळते. 

२. मित्र: आपण कोणाच्या संगीतत राहतो याने खूप मोठा फरक पडतो. आयुष्यात चांगले मित्र लाभणे याहून चांगली गोष्ट काय असू शकते? असे मित्र जे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवतील, जे फक्त मैत्री म्हणून चुकीचा सल्ला देता योग्य काय आहे हे समजून घेऊन आपली कानउघडणी करतील. जे आपल्या प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे मित्र आपल्याला गुरुसमानच आहेत.

३. निसर्ग : निसर्ग हा असा एक गुरू आहे जो आपल्याला प्रत्येक बदलला कसं सामोरं जायचं हे शिकवतो. सतत न चुकता बदलत जाणारे ऋतुमान आणि त्यानुसार स्वतः मध्ये बदल करत जाणारा हा निसर्ग. कोणतीही तक्रार नाही, फक्त स्वीकार. आयुष्यात ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत असतात त्यांना घाबरून न जाता कसं स्वीकारावं, सामोरं जावं हे आपल्याला निसर्ग शिकवतो.

४. लहान मूल: सतत काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न, शोधण्याचा प्रयत्न आणि जरी अपयश आले तरी परत उठून पुन्हा ती गोष्ट करत राहणे. हा धीटपणा, ही चिकाटी, नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास लहान मुलांमध्ये हे सहज दिसून येत आणि त्यातूनच आपण या गोष्टी शिकतो. जसे मुल चालायला सुरू करत तसे कित्येकदा तरी पडते, तरी पुन्हा उठून चालायचा प्रयत्न करते. कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उठून नव्याने सुरुवात करणे हे यातून आपण शिकतो.

५. साहित्य : शब्दांमध्ये किती ताकत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. चांगली पुस्तके, चांगलं साहित्य आपले उत्तम मार्गदर्शक ठरू शकतात. त्यातील अनुभव, शिकवण समजून घेतली त्यानुसार आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये बदल घडवून आणला तर आपल्या आयुष्यात खूप चांगले बदल घडू शकतात.

अश्या या गुरूंकडून आपण खूप काही शिकून आपलं आयुष्य घडवू शकतो.

Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...