तू आधी असा वागत नव्हतास, असा उलट सुलट बोलत नव्हतास, जेव्हापासून त्या वरुणसोबत फिरायला लागलास तुझं वागणं बोलणं पण तसच झालंय. काहीही म्हणा, तुमच्या गायत्रीसोबत राहायला लागल्यापासून आमची सुमन बरीच बदललीय. चार चांगले गुण घेतले तिने तिच्याकडून. असं हे बोलणं आपल्या रोजच्या जीवनात आपण सारखं ऐकत असतो. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, आपले मित्र मैत्रिणी आपल्या आजूबाजूची लोक चांगली असली पाहिजेत, आपली संगत चांगली पाहिजे असं सारखं म्हटलं जातं. याचं कारण लोकांचा, त्यांच्या सहवासाचा आपल्यावर परिणाम होत असतो, प्रभाव पडतो असतो आणि आपण स्वतः देखील अनुभवलं असेल. ज्यांच्या सानिध्यात आपण खूप काळ असतो, त्यांचे विचार वागणं तरी आपल्यात उतरत आणि पण नकळतपणे त्यांच्यासारखं वागायला सुरुवात करतो. आपली विचार करण्याची पद्धत तशी होऊन जाते, इतकंच काय वाटतं असेल, जाणवत असेल याची देखील आपल्याला जाणीव होते आणि आपण त्यांना कनेक्ट होऊन जातो.
या गोष्टी आपोआप होत नाहीत तर याला शास्त्रीय कारण आहे. सुरुवातीला प्राण्यांवर आणि नंतर माणसांवर केलेल्या निरिक्षणातून, प्रयोगातून हे सिद्ध झालंय की माणूस समोरच्याच्या वागण्यातून शिकत असतो, नकळतपणे तसच वागायचा प्रयत्न करतो, त्या माणसाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो याचं कारण आहे "mirror neurons'.
आपल्या ह्या सर्व गोष्टी करण्यामागे mirror neurons असतात, जे मेंदुच्या काही विशिष्ट भागांमध्ये आढळतात.
"Mirror neurons facilitate our learning by enabling us to imitate and understand the actions and behavior of those we observe."
लहान मुलांकडे पाहून हे लगेच लक्षात येत, याच कारण त्यांच्या आजूबाजूला जी माणसं असतात त्यांच अनुकरण करतात ती करतात. म्हणून लहान मुलांसमोर वागताना, बोलताना विचार करून बोलावं असं म्हटलं जातं. नवीन गोष्टी शिकणे, कौशल्य शिकणे, नवनवीन गोष्टी समजून घेणे या सगळ्यामध्ये "mirror neurons" चा वाटा असतो. समोरच्या माणसाच्या डोळ्यात पाणी बघून आपल्याला वाईट वाटणं, त्यांना हसताना पाहून आपल्याला आनंद होणं याचं कारण mirror neurons असतात. दुसऱ्याला मदत करण्यासाठी, त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे जी empathy माणसाकडे लागते ती देखील यातूनच येते. कारण empathetic असणं म्हणजे त्या माणसाला काय वाटतंय, त्याला काय जाणवत आहे याची जाणीव आपण करून घेणे, जेव्हा आपण त्या व्यक्तीला आपण पाहतो तेव्हा मेंदूमधील हे mirror neurons सक्रिय होतात, activate होतात ज्यातून आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो. या सगळ्या दृष्टीने mirror neurons महत्वाची भूमिका पार पाडतात. यामुळेच आपण दुसऱ्यासारखं वागायला लागतो आणि म्हणून आपण कोणामध्ये वावरतो, उठतो बसतो याला महत्त्व आहे. म्हणून संगत महत्त्वाची आहे. जर आपल्याला चांगल्या माणसाचा सहवास लाभला तर आपल्यालाच त्याचा फायदा होतो, नकळतपणे त्यांच्यासारखं आपलं आचरण होतं यासाठी नेहमी चांगल्या विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहिलं पाहिजे.

Comments
Post a Comment