Skip to main content

चांगल्या झोपेसाठी Sleep Hygiene

धावती लाईफस्टाईल, कामाच्या बदललेल्या वेळा, टेन्शन, फोनचा अतिवापर यासारख्या गोष्टींमुळे आपल्या झोपचे चक्र बदलून गेले आहे हे आपण नाकारणार नाही. आपल्या  चांगल्या आरोग्यासाठी किमान ७-८ तासांची झोप ही आवश्यक आहे. परंतु या बिघडलेल्या, बदललेल्या झोपेच्या चक्रामुळे आरोग्यावर उलट परिणाम होतो. निद्रानाश, चिडचिड, पित्त यासारख्या समस्या जाणवू लागतात. कामावर याचा परिणाम होतो, लक्ष लागत नाही. म्हणून जशी बाकी गोष्टींसाठी आपण स्वच्छ्ता पाळतो, hygiene पाळतो तसच झोपेसाठीसुद्धा ती पाळली पाहिजे ज्याला ' sleep hygiene ' म्हटले जाते. Sleep hygiene म्हणजे काय तर चांगल्या, पुरेश्या झोपेसाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे, काही नियम पाळणे, चांगल्या सवयी लावून घेणे. हे नियम कोणते ते पाहू...



१. झोपेची निश्चित वेळ ठरवणे: चांगल्या झोपेसाठी त्याची निश्चित वेळ ठरवणे खूप आवश्यक आहे. समजा आपली झोपायची वेळ १० असेल तर आपण त्याआधी आपली बाकीची काम आवरून झोपी गेले पाहिजे. बऱ्याचदा काही गोष्टी होतात, emergency असतात ज्यामुळे ही वेळ मागे पुढे होऊ शकते. पण आपला जास्तीत जास्त प्रयत्न हा असला पाहिजे की आपण ठरलेल्या वेळेत झोपी जाऊ.

२. चहा, कॉफीचे सेवन कमी करणे : बऱ्याच लोकांना झोपेच्या आधी चहा, कॉफी प्यायची सवय असते. परंतु याने आपली झोप कमी होते. कॅफेनचे अतिरिक्त सेवन आपल्या झोपेवर परिणाम करते. म्हणून याचे सेवन कमी केलं पाहिजे. याउलट झोपयच्या आधी गरम दूध घेतल्याने चांगली झोप लागते. 

३. झोपेच्या ठिकाणचा वापर फक्त झोपेसाठी: आपण ज्या गोष्टीचा जसा वापर करतो मेंदूला तशीच सवय लागते. त्यामुळे बेडवर बसून खाणे, वाचणे, काम करणे, काहीतरी बघत बसणे असं न करता त्याचा वापर फक्त झोपण्यासाठी केला पाहिजे. झोपेच्या ठिकाणचा वापर फक्त झोपेसाठी असला पाहिजे आणि तिथे शांतता असली पाहिजे. 

४. गरम पाण्याने अंघोळ आणि व्यायाम  : झोपायच्या आधी गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीर आणि मन शांत होते, रिलॅक्स होते आणि झोपदेखील लागते, तसेच हलका व्यायाम केल्यानेदेखील चांगली झोप लागायला मदत होते.

५. स्क्रीनचा वापर कमी : झोपताना स्क्रीनचा वापर केला तर त्याने झोपेच्या समस्या जाणवतात. म्हणून मोबाईल फोन आणि लॅपटॉप झोपण्याच्या सुमारे 30 मिनिटे आधी बंद करावेत आणि खोलीबाहेर ठेवावेत.

अश्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या तर नक्की आपली sleep cycle सुधारायला मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...