ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली, वाचली असेल. एका गावात एक सर्कस आली होती. ती पाहायला तिथे एक माणूस गेला. तंबू, मोठमोठ्या रींग्ज, हत्ती, घोडे सर्व काही तिथे होतं. हे सर्व पाहताना त्याचं लक्ष एका हत्तीकडे गेलं. मोठा आणि शक्तिशाली असा हत्ती. पण, त्याच्या पाहायला साधा दोरखंड बांधला होता आणि त्यात तो तसाच अडकून होता. एकंदरीत त्या हत्तिकडे पाहून त्याच्या शक्तीपुढे तो दोरखंड काहीही नव्हता, तरीदेखील तो त्यात अडकून पडला होता.
त्या माणसाला याचं आश्चर्य वाटलं. त्या हत्तीला सांभाळणारा माहूत तिथेच होता. तो माणूस त्याच्याकडे गेला व त्याने गोष्टीमागचे कारण त्याला विचारले, तेव्हा त्याने सांगितले, हे हत्ती वैगरे त्याच्याकडे लहान असल्यापासून त्याच्याकडे आहेत. हत्ती खूप लहान असताना तो त्याच्या पायात दोरखंड बांधत असे. त्यावेळी बांधत असलेला दोरखंड अजूनपर्यंत तसाच चालू आहे. आता हत्तीमध्ये त्याला काढून टाकण्याची ताकत आहेत, पण त्याला त्याची जाणीव नाही.
मानसशास्त्रामध्ये याला ' leanerd helpleness' म्हणजेच 'शिकलेली असहाय्यता ' असे म्हटले जाते. प्राण्यांवर आणि अगदी माणसांवर केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध झालंय की सुरुवातीला काही अनुभवातून जे अपयश येतं त्यातून माणूस इतका असहाय्य होतो की आपण काही करू शकतो, आपल्यात तो क्षमताच तो विसरून जातो आणि एकप्रकारे ही असहाय्यता शिकून घेतो.
याचा परिणाम पुन्हा तशी परिस्थिती आली की मला तसही यात काही करता येणार नाही, मग मी प्रयत्न का करू? माझ्यात ती क्षमताच नाही. मला या गोष्टीत यशच मिळणार नाही ही वृत्ती अंगवळणी पडते. याचे कारण मागचे अनुभव कुठेतरी अजून तसेच मनात ठसलेले असतात.
पण या सगळ्यात आपण हे विसरतो किंवा जेव्हा आपण हे अनुभव घेतले तेव्हाची परिस्थिती, वातावरण, आपल्या क्षमता सर्वच वेगळं होतं. त्यामुळे जरी त्यावेळी आपल्याला अपयश आलेलं असलं त्यावेळी जरी आपण असहाय्य असलो तरी गरजेचं नाही आता असू.
आता त्या परिस्थितीला सामोरं जायची, लहानपणी बांधलेला तो दोरखंड तोडण्याची क्षमता आपल्याकडे असणार आहे. फक्त ती ओळखण्याची गरज आहे.

Comments
Post a Comment