आपल्याला हा प्रश्न कधी पडलाय का? की दिवसभरात किंवा एकंदरीतच रोजच्या आयुष्यात वावरताना आपण ज्या काही गोष्टी करत असतो, पाहत असतो, अनुभवत असतो त्यातल्या पूर्ण झालेल्या गोष्टींपेक्षा अपूर्ण गोष्टी आपल्याला चांगल्या लक्षात राहतात. मग ते एखाद्या माणसाशी झालेलं अर्धवट बोलणं असेल, अर्ध्यावर वाचून ठेवलेलं पुस्तक असेल, अर्धवट केलेला प्रोजेक्ट किंवा मग इंटरवल पर्यंत पाहिलेली मूव्ही. पूर्ण केलेलं काम जितकं आपलं डोक्यात राहत नाही तितक्या या गोष्टी लक्षात राहतात, ज्यातून आपण त्या पूर्ण करायच्या मागे लागतो, त्यासाठी प्रेरित असतो. नाहीतर आपल्याला एकसारखी अस्वस्थता किंवा अर्धवटपणा जाणवतो. मानसशास्त्रामध्ये याला " zeigarnik effect " असं म्हटलं जातं.
काय आहे zeigarnik effect ??
हा effect सर्वात पहिल्यांदा रशियन मानसशास्त्रज्ञ bluma zeigarnik हिने मांडला. एकदा रेस्टॉरंटमध्ये ती आणि kurt Levin बसले असता एका वेटरने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्या वेटरला ज्या unpaid orders होत्या म्हणजेच ज्यांचं बील भरलेलं नव्हतं त्या चांगल्या लक्षात नव्हतं पण ज्यांचं बील पूर्ण झालेलं त्यांच्या details आठवायला मात्र त्यांना समस्या जाणवत होत्या. म्हणजेच काय की ज्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत त्यांच्या तुलनेत जी गोष्ट अर्धवट होती ती लक्षात होती.
हे पाहून zeigarnik ने नंतर अनेक प्रयोग केले. दोऱ्यात मणी ओवणे असेल, गणिते सोडवणे, कोडी सोडवणे. यात अर्ध्या सहभाग्यांना मध्ये मध्ये अडवण्यात आलं होतं. प्रयोगाअंती जेव्हा याचे निष्कर्ष काढण्यात आले तेव्हा हे समजलं की ज्यांना ही काम करताना मध्ये मध्ये अडवण्यात आलं होतं त्यांनी पुन्हा ते काम केलं होतं हे आठवण्यसाठी की ते नेमकं काय करत होते. ज्यांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय काम केली त्यांच्या बाबतीत असं झालं नाही.
याशिवाय zeigarnik ने पुढे अनेक प्रयोग केले आणि या संशोधनातून तिला हे दिसून आले की लोकांना पूर्ण झालेल्या कामापेक्षा अपूर्ण कामे ९०% जास्त आठवतात.
यात आपल्या स्मृतीची काय भूमिका आहे??
zeigarnik effect हा आपल्या स्मृतीशीच संबंधित आहे. आपली अल्पकालीन स्मृती म्हणजेच short term memory नावाप्रमाणेच काळ आणि क्षमतेच्या बाबतीत मर्यादित आहे. दिवसभरात आपण इतक्या गोष्टी करत असतो, ऐकत असतो, आजूबाजूला काही ना काही घडत असत. सर्व आपण आहे तसं लक्षात नाही ठेवू शकत. त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा ती गोष्ट आठवावी लागते. तेव्हा कुठे ती आपल्या स्मृतीमध्ये पक्की बसते. यात हेच होतं. जेव्हा एखादी गोष्ट अर्धवट राहते तेव्हा आपण ती परत परत डोक्यात आणतो, ' अरे मला ते करायचं आहे, माझं ते काम अजून पूर्ण झालेलं नाहीये, त्यांनी हा निरोप दिलेला तो अजून मी पोहोचवायचा आहे. '
हे असं करून आपण सतत त्या गोष्टी आपल्या स्मृतिमध्ये आणतो आणि म्हणून अर्धवट गोष्टी चांगल्या लक्षात राहतात आणि त्या पूर्ण करण्याच्या मागे आपण लागतो.
याचा वापर आपण आपल्यासाठी कसा करू शकतो ??
आपल्या हे लक्षात आलं की आपण एखाद काम अर्धवट ठेवलं की ते पूर्ण करायचं आहे याची आठवण आपल्याला सतत होत राहते आणि आपण त्यासाठी प्रेरित होतो तसच ते काम आपल्या लक्षात राहत. याचा वापर आपण अनेक ठिकाणी आपल्या फायद्यासाठी करू शकतो.
- एखादी गोष्ट करायची आहे, ध्येय पूर्ण करायचं आहे तर ऐनवेळी सर्व एकदम करण्यापेक्षा, मधे मधे थोडं थांबत, ब्रेक घेत ते काम केलं तर ते काम पूर्ण करण्याची शक्यता वाढते याचं कारण जेव्हा आपण ब्रेक घेऊन दुसरं काही करू लागतो तेव्हा डोक्यात मागे कुठेतरी हे काम पूर्ण करायचा विचार राहतोच आणि आपण ते करतो.
- अभ्यासाच्या बाबतीत देखील सरसकट परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्व वाचलं, कसतरी नुसतं पाठ केलं असं न करता रोज तुकड्या तुकड्यात अभ्यास केल्याने, थांबून पुन्हा आठवून, पाहून अभ्यास केला तर तो चांगला होतो.
- अगदी बऱ्याच गोष्टींमध्ये आपण जो चालढकलापणा करतो म्हणजेच गोष्टी नुसत्या पुढे टाकतो तिथे फक्त एक छोटी सुरुवात केली तरी आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आपण काहीतरी सुरू केलं आहे जे आपल्याला संपवायचं आहे हा विचार ते काम पूर्ण करायला मदत करतो. आपण ते काम कदाचित लवकर पूर्ण होणार नाही, पण किमान त्याची सुरुवात झाल्याने पूर्ण करायचा प्रयत्न तरी करू.
अश्या पद्धतीने जर आपण थोड थांबून थांबून काम केली, दोन पावलं मागे जाऊन गोष्टी पुन्हा एकदा डोक्यात आणल्या तर त्या चांगल्या लक्षात राहतात आणि आपण ते काम पूर्ण करतो आणि ते पूर्ण केल्याने आपला सेल्फ एस्टीम देखील वाढतो.
फोटो : google वरून साभार
संदर्भ : https://www.verywellmind.com/zeigarnik-effect-memory-overview-4175150

Comments
Post a Comment