Skip to main content

आदर्श ....स्वतःला घडविण्यासाठी

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याचे स्वतःचे असे काही आदर्श असतात.काही वेळा स्वतः बनविलेले तर बरेचदा इतरांनी ठरविलेले.का ठेवतो आपण आपल्या नजरेसमोर हे आदर्श ?तर आपल्या जडणघडणीला ,आपल्या आयुष्याला दिशा मिळावी ,आकार मिळावा म्हणून.
                   परंतु बरेचदा आपण त्यांच्यामध्ये ,त्यांच्या अस्तित्वामध्ये इतके गुंतत जातो की एका क्षणाला आपलं स्वतःच काही एक अस्तित्व आहे हेच आपल्याला पटत नाही.अर्थात यामध्ये इतरांचा प्रभावही तितकाच महत्वाचा ठरतो.तुला दुसरा आईनस्टाईन बनायचे आहे किंवा तुला दुसरा विवेकानंद व्हायचे आहे या गोष्टी मनावर इतक्या बिंबवल्या जातात की ते मूल स्वतःचे गुण ,दोष,आवडी-निवडी सर्व विसरुन एका वेगळया अस्तित्वामध्ये स्वतःला ढाळण्याचा प्रयत्न करते.परिणामी स्वतःकडून इतरांच्या व स्वतःच्या अपेक्षा खूप वाढतात . ज्या पूर्ण झाल्या तरी आपण स्वतःला कुठेतरी गमावलेलं असतं आणि अपूर्ण राहिल्या तर आपण आतून पूर्णपणे तुटतो....
             त्यामुळे मला दुसरा आईनस्टाईन व्हायचयं याचा विचार न करता त्याचे विचार समजून घेऊन मला लोकांचा आदर्श कसा होता येईल याचा विचार करा आणि लोकांचा आदर्श होण्यासाठी कोणाची copy करण्याची गरज नसते.
गरज असते त्यांची inspiration घेऊन स्वतःला घडविण्याची.
             त्यामुळे आदर्श असावेत ,परंतु घडवण्यासाठी स्वतःच  अस्तित्व संपविण्यासाठी नाही...



















Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

आयुष्यातील उत्सुकता कुठंतरी हरवून चाललीये......

 "अरे एक नवीन वेबसिरीज आलीय, खूप भारी आहे रे पण दर आठवड्याला फक्त एक एपिसोड, एक आठवडा थांबायचं, माझ्यात नाही बाबा इतके patience." "इतकंच ना, कश्याला टेन्शन घेतोस मी देतो तुला एक लिंक, त्यावरून सर्व एपिसोड डाउनलोड करता येतात. बघून टाक एकाचवेळी.... इतकं काय त्यात?"  हे आहे आपलं आताचं आयुष्य. फोनच्या एका क्लिकवर चालणारं. काही हवं झालं ऑर्डरचं बटन दाबा, काही माहिती हवी लिंक क्लिक करा.  काही शिकायचं आहे यूट्यूब आहे ना! आता या क्षणाला मला काहीतरी हवं आहे आणि त्यासाठी मला वाट पाहायला लागेल ही परिस्थिती आता कुठेतरी कमी होत चाललीये.  लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की प्रतीक्षा असायची ती गोळेवाल्याची, घंटीचा आवाज आला की आपण पैसे गोळा करून त्याची वाट पाहत बसायचो की कधी तो आपल्या घराजवळ येईल, या वाट पाहण्यात एक मजा होती, एक उत्सुकता होती. की आपल्याला यावेळी कोणता गोळा खायला मिळेल. आईकडून एक एक रुपया मिळाला तरी त्यातून काय घेऊ आणि काय नको असं व्हायचं. नवीन मुव्ही आलंय हे समजायचं ते फक्त थिएटरबाहेर लागलेल्या पोस्टर वरून आणि मग बाबांच्या मागे लागणं सुरू व्हायचं की आम्हाला ...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...