माणसाला खूप श्रद्धाळू ,समाजशील असे नेहमी मानले जाते. असा हा माणूस आपल्या जीवनात नेहमी कोणाच्या तरी आधारावर जगत असतो.मग त्याला आपण सोबत म्हणू ,अवलंबन म्हणू किंवा श्रद्धा म्हणू.श्रद्धा! किती मोठा शब्द आहे ना हा! कोणाकोणावर असते आपली श्रद्धा ? आई वडील, मित्र मैत्रिणी, शिक्षक आणि एक महत्वाचं राहिलचं की ,देव!
किती contraversial शब्द आहे ना हा. एकीकडे जीव देतो तर दुसरीकडे जीव घ्यायला लावतो.का होत असं? कुठे लिहिलयं का देवाने हे मागितलं ,जवळ येऊ नको म्हटलं,दुसरयाला मार म्हटलं .विचार केला का कधी यावर ?केला नसेल तर करा.असं यामुळे होत कारण आपण या देवाला ,या श्रद्धेला बाहेर शोधायचा प्रयत्न करतो आयुष्यभर.आता ही एक बाजू झाली देवाबद्दलची,त्याच्या श्रद्धेबद्दलची. जी आपल्याला ताकद देते.याप्रमाणेच दुसरी एक बाजू आहे भूत या संकल्पनेबाबतची जी आपल्याला घाबरवून सोडते ,कमजोर करून टाकते . माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचं भूत होत आणि ते दिसतं अस म्हणतात. बरीच लोक आम्ही अनुभवलयं असही म्हणतात .माफ करा पण मी ना कधी देवाला प्रत्यक्ष पाहिलय ना कधी भुताचा अनुभव घेतलाय आणि मला वाटतही नाही आयुष्यात पुढे कधी घेईन.
कारण मी या दोन्ही गोष्टी बाहेर शोधायचा कधी प्रयत्नच केला नाही.तुम्ही विचार करा ना एखादी व्यक्ती अशा ठिकाणाहून जिथे भूत आहे असे म्हटले जाते ज्याची तिला कल्पना नसते तेव्हा ती व्यवस्थित असते काहीही होत नाही .परंतु नंतर कुणीतरी सांगितल्यावरचं तिला कापरं भरण्याचं ,आजारी पडण्याचं काय कारण आहे? काय असत हे?खरचं कोणत्या भूताचं काम असतं का? नाही! हा विचारांचा प्रभाव असतो जो मनावर ठसवला जातो.
बरयाचदा एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिचा भास होतो अस म्हणतात. साहाजिक आहे जिच्यासोबत आयुष्य काढलं ती जरी एका क्षणात निघून गेली तरी तिच्या आठवणी,अस्तित्व निघून जाणं कसं शक्य आहे? मनात ज्या आठवणींच प्रतिबिंब आहे ते धूसर स्वरूपात का असेना डोळंयाना दिसणारच ना! परंतु आपण याला भूत, प्रेत ,आत्मा यासारखी नाव देऊन नको ते उपाय करू लागतो.
या दोन्ही बाजू ज्या आपण आयुष्यभर बाहेर पाहत राहतो ,शोधत राहतो कधी स्वतःमध्ये शोधायचा प्रयत्न केलाय का? तुम्ही जर तसा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला फरक नाही पडणार समोरची व्यक्ती देव मानते का नाही किंवा तुम्हाला देवाचे दर्शन मिळाल का नाही.फरक नाही पडणार समोरचा रस्ता भुताचा आहे की नाही या गोष्टीने .
या दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये आहेत .जेव्हा आपण दुसरयाला मदत करतो,जीव वाचवतो ते आपल दैवत्व असतं.आपले सकारात्मक विचार ज्यामुळे आपण यशस्वी वाटचाल करतो ते आपल दैवत्व असतं आणि आपण जेव्हा व्देष ,मत्सर,भिती या भावनांनी पेटलेले असतो तेव्हा आपल्यातील भूत बाहेर आलेले असते.
त्यामुळे श्रद्धा असावी जरुर असावी परंतु आयुष्यात उंचावणारी आणि ते शक्य आहे जेव्हा तुम्ही आतल्या देवाला ओळखाल......

शब्दांकन आणि जरा स्पष्ट हवं सुरुवातीला नीट लक्षात येत नाही पण प्रयत्न खूपच सुंदर आहे
ReplyDeleteOk
ReplyDelete