आज कामावर जायला खूप उशीर झालायं,लवकर आवरलं पाहिजे .अरे,किती काम पडलीत कधी होणार...उद्या submission ची शेवटची तारीख आहे ,लवकरात लवकर पूर्ण करायला हवं..असे आणि याहूनही अधिक विचार रोज आपल्या डोक्यात घोळत असतात .इतकी दमछाक होत असतानाही एक विचार सातत्याने डोक्यात येत असतो rather आपण ठसवत असतो .हे सर्व कोणासाठी चाललयं? माझ्यासाठी ,माझ्या चांगल्यासाठी आणि जरी इतरांसाठी खूप काही करत असलो तरी ते इतर नसतात.ती आपल्या आयुष्याची महत्वपूर्ण नाती असतात .वेळ न पाहता सतत काही ना काही चालू असतं.थोडाफार वेळ मिळाला तरीही तो इतरांसोबत जातो.काहींच्या वाट्याला तेही येत नाही .आयुष्यभर सगळ्यातलं सगळं केलं जातं.परंतु असे काही क्षण जे फक्त स्वतःसोबत घालवायचे होते, स्वतः जगायचे होते ते मात्र निघून गेलेले असतात.
असं म्हटलं जातं की आयुष्याचं खरं सार्थक आपण स्वतः बरोबर दुसरयांसाठी घालवलं कि होतं.परंतु या विचाराने काही जण स्वतःला पूर्णपणे विसरून केवळ दुसरयांसाठी जगतात.शेवटपर्यंत स्वतःचा शोध मात्र घेता येत नाही. इथे खरी गरज असते इतरांना काही काळ बाजूला करून स्वतःचा विचार करण्याची. स्वतःशीच बोलण्याची,स्वतःला समजून घेण्याची. स्वतः सोबत भांडायची, स्वतःवर रुसायची,स्वतःची स्तुती करण्याचीदेखील.यातून जे समाधान मिळतं ते पुढील काळाकरता आपल्याला खूप उपयोगी पडतं.
म्हणून आपल्या रोजच्या कामातून असा एकतरी दिवस काढावा जो आपण स्वतः सोबत घालवू शकतो. त्या पूर्ण दिवसात फक्त एकटं राहायचं,फिरायचं,स्वतःशी गप्पा मारायच्या ,आपल्या खोड्या आठवून गालातल्या गालात हसायचं ,जे ठरवलं आहे त्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे ना याचा विचार करायचा. त्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करायचा .आपले असे छंद जे मागे पडले आहेत ते पुन्हा जगायचे.आपल्या छोट्या छोट्या इच्छांची bucket list तयार करायची, ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करायची .त्या दिवसात आपल्याला जे जे करावसं वाटतं ते सर्व करावं. अगदी लहान व्हावसं वाटलं तेही व्हावं.
हा स्वतःचा एक दिवस, हे असे अनेक दिवस तुम्हाला आयुष्य सुंदर जगायला प्रेरणा उर्जा देतात आणि जेव्हा तुम्ही आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहाल तेव्हा आपल्याकडून काही करायचं राहून गेले नाही ना असा प्रश्न पडत नाही आणि पडला तरी त्याचे उत्तर सकारात्मक मिळेल..

👍👌
ReplyDelete👌👌☺
ReplyDeleteThanks for reply 😊
ReplyDelete