आयुष्याचं पण असच असतं ना. किती छोट आयुष्य आहे. आताच सर्व जगलं तर पुढे काही मिळणार नाही या एका गोष्टीवरून आपण तो प्रत्येक सुखाचा क्षण अश्या पद्धतीने नाकारतो, टाळण्याचा प्रयत्न करतो की जीवनाच्या अशाच एका संध्याकाळी आपल्या लक्षात येत की अरे ज्या अंतिम सुखाची आपण वाट पाहत होतो ते तर प्रत्येक क्षणी आपल्या पुढे हात पसरून होत. का नाही आपण त्याचा स्वीकार केला? का आपण त्याला वेळोवेळी नाकारलं? याच कारण आपल्याला वाटल की आता हा क्षण जगला तर कदाचित पुढे आपल्यासाठी काहीच उरणार नाही. पुढे कधीतरी आपल्याला मोठा आनंद, खूप सुख मिळेल या अपेक्षेने आपण तो प्रत्येक क्षण गमवला जो आपल्याला त्या वेळी आनंद देणारा होता. पण मग आता का नाही मी तो आनंद घेऊ शकत? आता का मी ते सुख उपभोगू शकत? याचं कारण माझ्याकडे तो जगायला आता वेळच नाही. म्हणूनच आयुष्य जेव्हा मुक्तहस्ताने सुखाची उधळण करत असत तेव्हा त्याचा स्वीकार करा नाहीतर एके संध्याकाळी सुख असेल पण ते जगायला जी वेळ पाहिजे ती मात्र निघून गेलेली असेल....
कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर. आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

Wow kiti chan vichar
ReplyDeleteThank u
ReplyDeleteTo good kavya .keep it up 👍👍👍👍
ReplyDeleteMast ahey
ReplyDeleteThanks for reply
ReplyDeleteKhup chan kavya
ReplyDeleteKhup chan 🥰
ReplyDeleteThank u
ReplyDelete