श्रुती, एक २८ वर्षांची लग्न झालेली सुंदर तरुणी. जेव्हा तीच लग्न झालं तेव्हा ती फक्त ग्रज्युएट झालेली होती. पण नवऱ्याच्या घरात सर्व पाठिंबा देणारे मिळाले आणि तिने तीच पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं व चांगल्या ठिकाणी नोकरी करू लागली. नवरा खूप समजूतदार, मदत करणारा होता. श्रुतीला जे काही करायची इच्छा व्हायची त्यात तो तिला पाठिंबा द्यायचा व हवी ती मदत देखील करायचा. आणखी काय हवं असतं एखाद्या व्यक्तीला. पण श्रुती जरा वेगळीच होती. तिचा स्वभाव काहीसा वेगळा होता. वेगळा या अर्थाने की तिला कितीही यश मिळालं, कितीही आनंद देणारी गोष्ट मिळाली तरीही ती त्या क्षणी तिच्याकडे जे नाही त्याचा विचार करत राहायची आणि त्यामुळे जे तिच्याकडे आहे त्याच महत्त्व कमी करून टाकायची. परिणामी, सर्व असूनही ती बऱ्याचदा असमाधानी राहायची. या तिच्या स्वभावामुळे ती सतत एक अपूर्णतेचा भाव घेऊन वावरायची आणि चालू परिस्थितीमधील आनंद घालवायची.
श्रुतीच्या बाबतीत जे झालं ते आपल्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यात होत असतं. सतत नवीन काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण जे काही चांगलं आपल्याकडे आहे त्याला विसरतो आणि सर्व आनंद घालवून बसतो. म्हणजे माझ्याकडे जर आता दुचाकी गाडी असेल तर ती कितीही चांगली का असेना माझ्याकडे चारचाकी नाही याच दुःख आपण करत राहतो. मी तीन खोल्यांच्या घरात सुखात राहू शकत असतानादेखील समोरच्याकडे जस आहे तस मोठं घर आपल्याकडे नाही याचा खेद करत राहतो. यातून काही चांगल निष्पन्न होत का? तर नाही. पण आपला जो एक दृष्टिकोन असतो की चांगल्या गोष्टीकडे न पाहता केवळ नाही त्यावर विचार करणे आपल्याला सतत असमाधानी ठेवतो. मग काय करायचं अश्या वेळी? असाच सतत नाही त्याचा विचार करायचा का? तर नाही. याउलट इथे आपण आपला दृष्टिकोन बदलायची गरज असते. तो कसा बदलायचा? तर आपल्याकडे जे या क्षणी आहे त्याबद्द्ल कृतज्ञ राहून त्याचा आनंद घेणे आणि जे आपल्याला मिळवायचे आहे ते कसे मिळवता येईल याबद्दल विचार करून त्यानुसार प्रयत्नशील राहणे. कारण जगातील कोणतीही व्यक्ती पूर्णपणे समाधानी किंवा असमाधानी कधी नसते. आपलं समाधान आणि असमाधान आपल्या त्या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टीमध्ये असतो. ती दृष्टी एकदा बदलली की आपण आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहू लागतो.
Awesome dear
ReplyDeleteThank u ...
Delete