Skip to main content

दृष्टिबदल

   श्रुती, एक २८ वर्षांची लग्न झालेली सुंदर तरुणी. जेव्हा तीच लग्न झालं तेव्हा ती फक्त ग्रज्युएट झालेली होती. पण नवऱ्याच्या घरात सर्व पाठिंबा देणारे मिळाले आणि तिने तीच पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं व चांगल्या ठिकाणी नोकरी करू लागली. नवरा खूप समजूतदार, मदत करणारा होता. श्रुतीला जे काही करायची इच्छा व्हायची त्यात तो तिला पाठिंबा द्यायचा व हवी ती मदत देखील करायचा. आणखी काय हवं असतं एखाद्या व्यक्तीला. पण श्रुती जरा वेगळीच होती. तिचा स्वभाव काहीसा वेगळा होता. वेगळा या अर्थाने की तिला कितीही यश मिळालं, कितीही आनंद देणारी गोष्ट मिळाली तरीही ती त्या क्षणी तिच्याकडे जे नाही त्याचा विचार करत राहायची आणि त्यामुळे जे तिच्याकडे आहे त्याच महत्त्व कमी करून टाकायची. परिणामी, सर्व असूनही ती बऱ्याचदा असमाधानी राहायची. या तिच्या स्वभावामुळे ती सतत एक अपूर्णतेचा भाव घेऊन वावरायची आणि चालू परिस्थितीमधील आनंद घालवायची.

      श्रुतीच्या बाबतीत जे झालं ते आपल्या बऱ्याच लोकांच्या आयुष्यात होत असतं. सतत नवीन काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण जे काही  चांगलं आपल्याकडे आहे त्याला विसरतो आणि सर्व आनंद घालवून बसतो. म्हणजे माझ्याकडे जर आता दुचाकी गाडी असेल तर ती कितीही चांगली का असेना माझ्याकडे चारचाकी नाही याच दुःख आपण करत राहतो. मी तीन खोल्यांच्या घरात सुखात राहू शकत असतानादेखील समोरच्याकडे जस आहे तस मोठं घर आपल्याकडे नाही याचा खेद करत राहतो. यातून काही चांगल निष्पन्न होत का? तर नाही. पण आपला जो एक दृष्टिकोन असतो की चांगल्या गोष्टीकडे न पाहता केवळ नाही त्यावर विचार करणे आपल्याला सतत असमाधानी ठेवतो. मग काय करायचं अश्या वेळी? असाच सतत नाही त्याचा विचार करायचा का? तर नाही. याउलट इथे आपण आपला दृष्टिकोन बदलायची गरज असते. तो कसा बदलायचा? तर आपल्याकडे जे या क्षणी आहे त्याबद्द्ल कृतज्ञ राहून त्याचा आनंद घेणे आणि जे आपल्याला मिळवायचे आहे ते कसे मिळवता येईल याबद्दल विचार करून त्यानुसार प्रयत्नशील राहणे. कारण जगातील कोणतीही व्यक्ती पूर्णपणे समाधानी किंवा असमाधानी कधी नसते. आपलं समाधान आणि असमाधान आपल्या त्या गोष्टीकडे  पाहण्याच्या दृष्टीमध्ये असतो. ती दृष्टी एकदा बदलली की आपण आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहू लागतो. 

        निर्णय आपल्या हातात आहे नाही त्याकडे लक्ष देऊन आहे त्याचा आनंद घालवायचा की आहे त्याचा आनंद घेत घेत अजून आनंद शोधायचा......विचार करा यावर...
  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...