Skip to main content

गोंधळ भूमिकांचा

   Mr. राणे यांना खूप राग आला होता. त्याला कारणही होत. झालं असं, की राणे हे एका शाळेत गणिताचे शिक्षक. त्यांची त्या विषयावरची पकड पण मजबूत. त्याचबरोबर त्यांचा अनुभव, त्यांचं शिकवण सर्वच कस नीट, समजण्याजोग. पण त्यांची आताची अवस्था काहीशी दिव्याखाली अंधार अशी झालेली. दिव्याखाली अंधार म्हणण्याचं कारण अस की ते ज्या विषयात इतके हुशार त्याच्या नेमक उलटा त्यांचा मुलगा प्रवीण. त्याला गणित हा विषय आवडतही नाही आणि म्हणावा तसा समजतही नाही. इथून खरी समस्येला सुरुवात होते. राणेंना राग येण्याचं कारणही हेच होत. आपण ज्या विषयात पारंगत आहोत त्याबद्द्ल मुलाला जरासुद्धा आस्था असू नये हे काही त्यांना पटत नाही. 

  मग काय, सुरू होतो त्याला गणित शिकवण्याचा अट्टाहास. पण काही केल्या त्यांच्या प्रयत्नांना यश येत नसत. बरं विषयातील काही माहीत नाही अस नाही . तरीही अस का होतय? आपला मुलगा आपलं का ऐकत नाही हे त्यांना समजत नसत आणि त्यातून त्यांची चिडचिड अजून वाढत असते. काय बर असेल खर कारण? का बाहेर उत्तम शिकवणारा शिक्षक मुलाला काही सांगू शकत नाही ? तर याच खर कारण आहे त्यांचा त्यांच्या भूमिकांमध्ये होत असलेला गोंधळ. मुळातच व्यक्ती त्याच्या एकूण आयुष्यात कधीच एकच अशी भूमिका पार पाडत नसते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अनेक भूमिका निभावत पुढे जावं लागत असत. परंतु काही वेळा या अनेक भूमिका नेमकेपणाने, पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या वेळी पार पाडताना व्यक्ती कमी पडते आणि तेव्हा हा गोंधळ होतो. जस, जेव्हा राणे आपल्या मुलाला गणित शिकवायला जातात तेव्हा ते पूर्णपणे त्यांच्या शिक्षकाच्या भूमिकेत शिरतात. पण त्यावेळी ते हे विसरतात की त्यांच्या मुलासमोर ते आधी त्याचे वडील आहेत आणि नंतर एक शिक्षक. ज्या काही गोष्टी त्यांनी वडील या नात्याने मुलाला सांगितल्या पाहिजेत, समजावल्या पाहिजेत त्या काही प्रमाणात बाजूला राहतात आणि त्या नात्यातला ओलावा जाऊन एक प्रकारची पोकळी निर्माण होते. म्हणूनच बाहेर एक उत्तम शिक्षक असून ते आपल्या मुलाला समजावताना कमी पडतात.

आपल्या अनेकांच्या आयुष्यात अस नेहमी होत असत. आपण एकावेळी अनेक भूमिका निभावत असतो. या भूमिका म्हणजे एकप्रकारचा मुखवटा असतो. जो आपल्याला त्या त्या वेळी बदलत राहण्याची गरज असते . कारण अस न करण्याचे समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे मी बाहेर उत्तम डॉक्टर आहे म्हणून हे गरजेचं नसत की मी माझ्या मित्रासोबत ही डॉक्टर म्हणूनच वागल, बोललं पाहिजे. मी एक उत्तम समुपदेशक असेन तर गरजेचं नसत माझ्या घरच्या लोकांनीही माझच ऐकुन त्याप्रमाणे वागल पाहिजे. अश्या अट्टाहासाने किंवा या भूमिकांच्या गोंधळाने समोरच्यावर आपला प्रभाव कमी पडतोच पण आपलं नातं बिघडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून योग्य हेच ठरत की आपण कोणत्या परिस्थितीत कोणत्या व्यक्ती, समूह, नात्यामध्ये आहोत हे पाहून त्याप्रमाणे ती भूमिका पार पाडावी लागते. तेव्हाच  आपलं आयुष्य खेळकर आणि समाधानी होत.

Comments

  1. Khup chan bhavnik gondhal baddal sangitle ahes .apple asech ast ki baherchya jagat vavrto tsse ghari vagnyacha praytne karto kiva ghari vavarto tase baher vagnyacha praytna karto.ani mg lok aplyala chukich samjtat.

    ReplyDelete
  2. Very nice thought , So true thoughts to share care for each other

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...