प्रत्येक व्यक्तीची आयुष्य जगायची एक पद्धत असते.ज्यामधे कसं वागायचं, कसं वागू नये, काय करावं , काय करू नये हे ठरलेले असते. ज्याला आपण आदर्श असे म्हणतो. जे प्रत्येकाचे वेगळे असतात. उदा. समीर हा एक मध्यमवर्गीय तरुण. एका बँकेत नोकरी करणारा. त्याला स्वतः च्या आयुष्याबद्दल काही फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. जी परिस्थिती आहे त्यात आनंदी आणि समाधानी राहणे असा त्याचा स्वभाव.
फक्त एकच गोष्ट त्याला आवडत नसे किंबहुना त्याच्या आदर्शात बसत नसे ती म्हणजे खोटं बोलणे. कोणाशीही कोणत्याही परिस्थितीत आपण खोटं बोलू नये अस त्याच म्हणणं.पण एक प्रसंग असा आला की त्यात समीरकडे काही पर्याय उरला नाही आणि त्याला नाईलाजाने खोटे बोलावे लागले. त्याला खोटं बोलावं लागलं इथपर्यंत ही गोष्ट थांबली नाही; तर त्यातून त्याला अपराधीपणा म्हणजेच guilt यायला लागला.
कधी येतो माणसाला अपराधीपणा? " जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते आणि आपण स्वतःच्या नजरेतून उतरतो ". या भावनेमध्ये व्यक्ती केलेल्या चुकीची जबाबदारी घ्यायची सोडून स्वतःला दोष द्यायला सुरू करते आणि एखाद लेबल लावून मोकळी होते. समीर च्या बाबतीत तेच झालं. इथे त्याला जी गोष्ट आवडत नव्हती तीच त्याने केली होती आणि या चुकीबद्दल त्याने स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली. जसं की, मी खोटं बोललो याचा अर्थ मी खोटारडा माणूस आहे. इथे स्वतःला खोटारडा म्हणणं म्हणजेच label. व्यक्ती त्याच्याकडून काही चूक झाली तर स्वतःला पूर्णपणे चुकीचं समजून विशेषण म्हणजेच लेबल लावायला सुरू करते. जसं की मूर्ख, दुष्ट, नालायक इत्यादी. समीरच्या बाबत ही चूक होती खोट बोलणं आणि म्हणून त्याने स्वतःला खोटारडा म्हणायला सुरुवात केली. पण हे खरं आहे का? माणूस पूर्णपणे दोषी किंवा पूर्णपणे चांगला असू शकतो का?
उदा. आपण आपल्या ऑफिसवर रोज दिलेल्या वेळेत जातो. याचा अर्थ आपण ती वेळ व्यवस्थित पाळतो, जी चांगली गोष्ट आहे. परंतु काही वेळा काही कारणाने आपल्याला वेळ पाळायला जमत नाही आणि आपण उशिरा जातो जी ऑफिसच्या नियमानुसार चुकीची गोष्ट आहे. काय लक्षात येत हे उदाहरण पाहून? की काहीवेळा जरी आपल्याकडून चुका होत असल्या तरी त्याच गोष्टी आपण बरेचदा चांगल्या पद्धतीने देखील करतो. मग प्रश्न हा पडतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करतो तेव्हा कश्याचा वापर करतो आणि तीच गोष्ट आपल्याकडून चुकते तेव्हा काय कमी पडलेलं असतं?
तर त्याचं उत्तर आहे कौशल्य. जेव्हा आपण एखादी गोष्ट सततच्या सरावाने शिकतो तेव्हा त्याचा कौशल्य आपल्याला येत. जेव्हा हे कौशल्य आपण वापरतो तेव्हा आपण गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो आणि कौशल्य जेव्हा कमी पडत तेव्हा आपल्याकडून चुका होतात.
याचा साधं उदाहरण म्हणजे आपली आई. वर्षानुवर्षे स्वयंपाक करून तिचा त्यात सराव झालेला असतो आणि म्हणूनच कमी वेळात, कमी सामान असतानासुद्धा ती उत्तम जेवण करते.
म्हणूनच माणूस हा पूर्णपणे बरोबर किंवा चुकीची नसतो. कारण जरी आपण एखादी गोष्ट नीट करत असलो तरी आपल्याकडून चुका या होतातच. त्याचप्रमाणं आपल्यामध्ये बरोबर आणि चूक अश्या दोन्ही गोष्टी असतात. म्हणूनच जेव्हा आपल्याकडून काही वेळा चुका होतात तेव्हा स्वतःला पूर्णपणे दोषी न समजता यावेळी आपलं कोणते कौशल्य कमी पडले यावर विचार करायचा यामुळे आपण केलेल्या चुकीची जबाबदारी घेऊन त्यावर काम करायला सुरू करतो आणि आपल्याला त्या गोष्टीचा आलेला अपराधीपणा कमी होतो.

Very beautiful ❤️
ReplyDelete