Skip to main content

अपराधीपणा


प्रत्येक व्यक्तीची आयुष्य जगायची एक पद्धत असते.ज्यामधे कसं वागायचं, कसं वागू नये, काय करावं , काय करू नये हे ठरलेले असते. ज्याला आपण आदर्श  असे म्हणतो. जे प्रत्येकाचे वेगळे असतात.  उदा. समीर हा एक मध्यमवर्गीय तरुण. एका बँकेत नोकरी करणारा. त्याला स्वतः च्या आयुष्याबद्दल काही फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. जी परिस्थिती आहे त्यात आनंदी आणि समाधानी राहणे असा त्याचा स्वभाव. 

फक्त एकच गोष्ट त्याला आवडत नसे किंबहुना त्याच्या आदर्शात बसत नसे ती म्हणजे खोटं बोलणे. कोणाशीही कोणत्याही परिस्थितीत आपण  खोटं बोलू नये अस त्याच म्हणणं.पण एक प्रसंग  असा आला की त्यात समीरकडे काही पर्याय उरला नाही आणि त्याला नाईलाजाने खोटे बोलावे लागले. त्याला खोटं बोलावं लागलं इथपर्यंत ही गोष्ट थांबली नाही; तर त्यातून त्याला अपराधीपणा म्हणजेच guilt यायला लागला. 

        कधी येतो माणसाला अपराधीपणा?  " जेव्हा आपल्याकडून  एखादी चूक होते आणि आपण स्वतःच्या नजरेतून उतरतो ". या भावनेमध्ये व्यक्ती केलेल्या चुकीची जबाबदारी घ्यायची सोडून स्वतःला दोष द्यायला सुरू करते आणि एखाद लेबल लावून मोकळी होते. समीर च्या बाबतीत तेच झालं. इथे त्याला जी गोष्ट आवडत नव्हती तीच त्याने केली होती आणि या चुकीबद्दल त्याने स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली. जसं की, मी खोटं बोललो याचा अर्थ मी खोटारडा माणूस आहे. इथे स्वतःला खोटारडा म्हणणं म्हणजेच label. व्यक्ती त्याच्याकडून काही चूक झाली  तर  स्वतःला पूर्णपणे चुकीचं समजून विशेषण म्हणजेच लेबल लावायला सुरू करते. जसं की मूर्ख, दुष्ट, नालायक इत्यादी.   समीरच्या बाबत ही चूक होती खोट बोलणं आणि म्हणून त्याने स्वतःला खोटारडा म्हणायला सुरुवात केली.  पण हे खरं आहे का? माणूस पूर्णपणे दोषी किंवा पूर्णपणे चांगला असू शकतो का? 

उदा. आपण आपल्या ऑफिसवर रोज दिलेल्या वेळेत जातो. याचा अर्थ आपण ती वेळ व्यवस्थित पाळतो, जी चांगली गोष्ट आहे. परंतु काही वेळा काही कारणाने आपल्याला वेळ पाळायला जमत नाही आणि आपण उशिरा जातो जी ऑफिसच्या नियमानुसार चुकीची गोष्ट आहे. काय लक्षात येत हे उदाहरण पाहून? की काहीवेळा जरी आपल्याकडून चुका होत असल्या तरी त्याच गोष्टी आपण बरेचदा चांगल्या पद्धतीने देखील करतो. मग प्रश्न हा पडतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करतो तेव्हा कश्याचा वापर करतो आणि तीच गोष्ट आपल्याकडून चुकते तेव्हा काय कमी पडलेलं असतं?

तर त्याचं उत्तर आहे कौशल्य. जेव्हा आपण एखादी गोष्ट सततच्या सरावाने शिकतो तेव्हा त्याचा कौशल्य आपल्याला येत. जेव्हा हे कौशल्य आपण वापरतो तेव्हा आपण गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो आणि कौशल्य जेव्हा कमी पडत तेव्हा आपल्याकडून चुका होतात.

 याचा साधं उदाहरण म्हणजे आपली आई. वर्षानुवर्षे स्वयंपाक करून तिचा त्यात सराव झालेला असतो आणि म्हणूनच कमी वेळात, कमी सामान असतानासुद्धा ती उत्तम जेवण करते.

म्हणूनच माणूस हा पूर्णपणे बरोबर किंवा चुकीची नसतो. कारण जरी आपण एखादी गोष्ट नीट करत असलो तरी आपल्याकडून चुका या होतातच. त्याचप्रमाणं आपल्यामध्ये बरोबर आणि  चूक अश्या दोन्ही गोष्टी असतात. म्हणूनच जेव्हा आपल्याकडून काही वेळा चुका होतात तेव्हा स्वतःला पूर्णपणे दोषी न समजता यावेळी आपलं कोणते कौशल्य कमी पडले यावर विचार करायचा यामुळे आपण केलेल्या चुकीची जबाबदारी घेऊन त्यावर काम करायला सुरू करतो आणि आपल्याला त्या गोष्टीचा आलेला अपराधीपणा कमी होतो.




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...