Skip to main content

SMART ध्येय

तुम्ही कधी कोड सोडवलं आहे का? ज्यामधे एक end point असतो आणि तिथपर्यंत जायचे विविध मार्ग दिलेले असतात.  त्यातील योग्य मार्ग निवडून आपल्याला जायचं असत. पण काय होईल जर end point दिलाच नसेल तर? आपल्याला माहीतच नसेल आपण कुठपर्यंत जायचं आहे , कशासाठी जायचं आहे तर आपण कोणत्याही मार्गाने गेलो तरी काही फरक पडेल का? बरं अशा जाण्याला तरी काही अर्थ राहील का?  

ध्येयहिन आयुष्याच पण असंच असतं. आपल्या आयुष्यात जर ध्येय नसतील तर आपण का जगतो हे आपल्यालाही समजत नाही. म्हणून आयुष्याला आकार येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी ध्येय असण खूप आवश्यक आहे. बरं! ध्येय ठरवायची तर आहेत पण ती कशी? उदा. मला दोन दिवसात 20kg  वजन कमी करायचं आहे. या ध्येयाला ना कोणता आराखडा ना कोणतं मोजमाप. अशा प्रकारची अवास्तव ध्येय ठेवून आपल्या हाती निराशाच येते. म्हणूनच ध्येय ही 'smart' असावी लागतात.म्हणजेच

S-(specific)- कोणतेही ध्येय ठरवताना ते स्पष्ट आणि विशिष्ट असेल तर आपल्याला पूर्ण करताना अडचणी येत नाहीत.

M- (measurable)- ध्येय ठरवल्यावर त्याच मापन करण गरजेच असत. त्यामुळे आपल्याला आपल्या कामाची गती समजते व त्यानुसार आपण वाटचाल करतो.

A-(achievable)- ध्येय हे साध्य करता येईल अस असावं.आपल्या क्षमतांचा आणि आजूबाजूच्या परिस्थितिचा विचार करून ध्येय ठरवावं.

R-(realistic)- ध्येय ही वास्तववादी असावीत. तरच ती मिळवता येतात. अवास्तव ध्येय ठेवून ती पूर्ण करण्यात अडचणी येतात आणि मग त्यातून बरेचदा निराशा येण्याची शक्यता असते.

T-(time bounded)- एखादं ध्येय ठरवताना त्याला वेळ मर्यादा लावल्याने तेवढ्या वेळेत ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहतो आणि आपल्या कामाला एक प्रकारची शिस्त येते.

उदा. आपल्याला वजन कमी करायचे आहे.

S- सहा महिन्यात 20kg वजन कमी करणे.

M- काही दिवसांच्या  अंतराने वजन चेक करणे. यातून आपल्याला आपली प्रोग्रेस समजते.

A- योग्य व्यायाम, पथ्य यातून हे ध्येय साध्य करता येते.

R- 6 महिन्यात 20kg  वजन कमी करणे हे फिटनेस ट्रेनर नुसार वास्तववादी ध्येय आहे.

T- आपल्याला वेळेची मर्यादा माहित असल्याने आपण त्या वेळेत वजन कमी करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करणार. 6महिन्यांहून जास्त आपल्याकडे वेळ नाही हे आपल्याला माहित असत.

अशाप्रकारची छोटी छोटी पण 'smart' ध्येय ठेवल्याने आपण आपल्या आयुष्यातील मोठी ध्येय पण मिळवू शकतो. पण त्यासाठी ती ठेवणं महत्त्वाचं आहे नाही का ?



 



Comments

  1. I too like this goal setting process n I have made this chart n found that one can really reach to goals by right planning

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...