तुम्ही कधी कोड सोडवलं आहे का? ज्यामधे एक end point असतो आणि तिथपर्यंत जायचे विविध मार्ग दिलेले असतात. त्यातील योग्य मार्ग निवडून आपल्याला जायचं असत. पण काय होईल जर end point दिलाच नसेल तर? आपल्याला माहीतच नसेल आपण कुठपर्यंत जायचं आहे , कशासाठी जायचं आहे तर आपण कोणत्याही मार्गाने गेलो तरी काही फरक पडेल का? बरं अशा जाण्याला तरी काही अर्थ राहील का?
ध्येयहिन आयुष्याच पण असंच असतं. आपल्या आयुष्यात जर ध्येय नसतील तर आपण का जगतो हे आपल्यालाही समजत नाही. म्हणून आयुष्याला आकार येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी ध्येय असण खूप आवश्यक आहे. बरं! ध्येय ठरवायची तर आहेत पण ती कशी? उदा. मला दोन दिवसात 20kg वजन कमी करायचं आहे. या ध्येयाला ना कोणता आराखडा ना कोणतं मोजमाप. अशा प्रकारची अवास्तव ध्येय ठेवून आपल्या हाती निराशाच येते. म्हणूनच ध्येय ही 'smart' असावी लागतात.म्हणजेच
S-(specific)- कोणतेही ध्येय ठरवताना ते स्पष्ट आणि विशिष्ट असेल तर आपल्याला पूर्ण करताना अडचणी येत नाहीत.
M- (measurable)- ध्येय ठरवल्यावर त्याच मापन करण गरजेच असत. त्यामुळे आपल्याला आपल्या कामाची गती समजते व त्यानुसार आपण वाटचाल करतो.
A-(achievable)- ध्येय हे साध्य करता येईल अस असावं.आपल्या क्षमतांचा आणि आजूबाजूच्या परिस्थितिचा विचार करून ध्येय ठरवावं.
R-(realistic)- ध्येय ही वास्तववादी असावीत. तरच ती मिळवता येतात. अवास्तव ध्येय ठेवून ती पूर्ण करण्यात अडचणी येतात आणि मग त्यातून बरेचदा निराशा येण्याची शक्यता असते.
T-(time bounded)- एखादं ध्येय ठरवताना त्याला वेळ मर्यादा लावल्याने तेवढ्या वेळेत ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहतो आणि आपल्या कामाला एक प्रकारची शिस्त येते.
उदा. आपल्याला वजन कमी करायचे आहे.
S- सहा महिन्यात 20kg वजन कमी करणे.
M- काही दिवसांच्या अंतराने वजन चेक करणे. यातून आपल्याला आपली प्रोग्रेस समजते.
A- योग्य व्यायाम, पथ्य यातून हे ध्येय साध्य करता येते.
R- 6 महिन्यात 20kg वजन कमी करणे हे फिटनेस ट्रेनर नुसार वास्तववादी ध्येय आहे.
T- आपल्याला वेळेची मर्यादा माहित असल्याने आपण त्या वेळेत वजन कमी करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करणार. 6महिन्यांहून जास्त आपल्याकडे वेळ नाही हे आपल्याला माहित असत.
अशाप्रकारची छोटी छोटी पण 'smart' ध्येय ठेवल्याने आपण आपल्या आयुष्यातील मोठी ध्येय पण मिळवू शकतो. पण त्यासाठी ती ठेवणं महत्त्वाचं आहे नाही का ?

I too like this goal setting process n I have made this chart n found that one can really reach to goals by right planning
ReplyDeleteYes, definitely
Delete