Skip to main content

अशा प्रसंगी काय करावे?

आपण  माणसं आहोत. आता माणूस आहे म्हटल्यावर मन आलं. मनात काय असत तर वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या भावना आणि या विचार, भावनांच्या आधारे आपण वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जात असतो. तो प्रसंग हाताळत असतो. पण दर वेळी हे विचार किंवा या भावना त्या त्या परिस्थितीत योग्य असतीलच अस नाही. असल्या तरी योग्य प्रमाणात असतील अस नाही. 

उदा. अचानक परीक्षा आहे अस सांगितल्या नंतर भीती वाटणं किंवा चिंता वाटणं त्या प्रसंगात योग्य आहे. वाघाची चाहूल लागल्यावर ससा पळून जातो कारण त्याला त्याचा जीव वाचवायचा आहे. त्याने अस नाही केलं तर त्याचा जीव धोक्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अडचणीच्या प्रसंगात तशा प्रकारच्या भावना व्यक्त करण ही माणसाची प्रवृत्ती आहे. 

पण अडचणीच्या प्रसंगात नेमक्या कोणत्या भावना व्यक्त करायच्या म्हणजेच सकारात्मक की नकारात्मक, चांगल्या की वाईट यामध्ये बऱ्याचदा लोकांचा गोंधळ उडतो. 

बऱ्याच लोकांना अस वाटत की काहीही झालं, कितीही चांगले वाईट प्रसंग आले तरी आपण सकारात्मक राहील पाहिजे. तश्याच भावना असल्या पाहिजेत. पण सकारात्मक भावना ठेवण म्हणजे चांगल होण नाही. समजा पुरात घर बुडण्याची शक्यता आहे आणि आपण आपल्याला काही होणार नाही अस म्हणून निवांत राहिलो आनंदी राहिलो तर आपलं नुकसान होण्याची शक्यताच जास्त आहे. कारण आपण संकट आल्यानंतर त्याला सामोरे जाण्याची काही पूर्वतयारी केलेली नसेल. म्हणजेच काय तर दर वेळी सकारात्मक भावना चांगली असेलच अस नाही.

बरीच लोकं पेच प्रसंगांमध्ये पूर्णपणे कोलमडतात. काही लोकांना अस वाटत असत की आपण कशाचा काही फरकच पाडून घेऊ नये. पण समोर धोका असताना त्याबद्द्ल उदासीन राहून काहीच न करण हे स्वतःला  फसविण्यासारख आहे.

काही जण या नकारात्मक भावनांना इतके कंटाळतात की त्यांना वाटत की ही भावनाच आपल्याला येऊ नये. 

थेरपी साठी येणाऱ्या बऱ्याच जणांना अस वाटत असत की हा त्रास आणि त्रास ज्यातून निर्माण होतोय ती भावना पूर्णच निघुन जावी. म्हणजे रागाचा त्रास असेल तर माझा राग पूर्णपणे निघुन जायला पाहिजे. मला अजिबातच चिंता वाटली नाही पाहिजे. मला कसलीच भीती नाही वाटली पाहिजे.

पण हे सर्व शक्य आहे का? दीर्घकालीन आपल्याला फायद्याचं ठरणांर आहे का? 

आपल्या श्वासाचा वेग वाढला तर श्वास फुलतो आपल्याला धाप लागते. श्वास कमी झाला तर घुसमट होते आणि श्वास बंद झाला तर काय होईल हे  आपल्या सर्वांना माहीतच आहे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अस म्हणू शकत नाही की आपण श्वास घेतलाच नाही पाहिजे. 

तसच  अडचणीमध्ये व्यक्त केलेली नकारात्मक भावना स्वाभाविक जरी असली तरी ती खूप जास्त येणं, कमी प्रमाणात येणं हे आरोग्यदायी नाही, या अनारोग्यादयी नकारात्मक भावना आहेत.

मग काय करायचं जर या सर्व गोष्टी करायच्या नसतील तर? कारण अडचणी तर येणार आहेत, तशा भावना ही येणार. मग यावर काय उपाय असू शकतो? याला काय पर्याय असू शकतो?

तर यावेळी या अनारोग्यादयी नकारात्मक भावनेला आरोग्यदायी आणि उपयोगी अश्या  नकारात्मक भावनेत बदलणे

 उदा. स्वतःच्या रक्षणासाठी, प्रतीकरासाठी वापरलेला राग.  चिंता जास्त झाली तरी वाईट आणि ती घालवली तरी आपलं नुकसान. म्हणून चिंतेला काळजी या नकारात्मक पण उपयोगी भावनेत बदलणे गरजेचं आहे. म्हणजेच परीक्षेत जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर अभ्यास केला पाहिजे तो नाही केला तर नापास होऊ शकतो हे लक्षात घेऊन अभ्यास करण म्हणजेच काळजी घेऊन काम करणे. स्वतःकडून एखादी चूक झाली तर अपराधी वाटून न घेता त्या चुकीची जबाबदारी घेऊन ती सुधारण गरजेचं आहे. ही जबाबदारी म्हणजे नकारात्मक उपयोगी भावना.


 - काव्या धनंजय गगनग्रास.  (एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...