Skip to main content

असा हा प्रवाह

निशाला आज खूप अस्वस्थ वाटत होत. कारण अस होत की ती एका कंपनी मध्ये खूप वर्ष काम करत होती. पण काही कारणामुळे तिला ती कंपनी सोडावी लागली.   या कंपनी मध्ये तिच्या खूप साऱ्या आठवणी होत्या. खूप काही शिकायला मिळालं होत. चांगले संबंध तयार झाले होते. पण आता तिला परत तिथे जाता येणार नव्हत. म्हणून ती अस्वस्थ झाली होती. काहीतरी निसटल्यासारखं, चुकल्यासारखं तिला वाटत होत. 

पुढे काय करायचं हा ही एक प्रश्न होताच. इतक्या वर्षांची सवय, रूटीन सर्वच आता बदलणार. परत नव्याने सर्व घडी बसवायची. या सर्वच गोष्टींचा नाही म्हटलं तरी तिला ताण आलाच होता. या सर्व गोष्टींचा मेळ बसवून परत आयुष्य सुरू करायचं. आपण कुठेतरी अडकु की काय, थांबून जाऊ की काय अशी भीती पण तिला वाटत होती. 

एक दिवस निशाची मैत्रीण मिता तिला भेटायला आली. तेव्हा निशाची ही अस्वस्थता तिला जाणवली. तिने त्याचे कारण तिला विचारले. तेव्हा निशाने सांगितले. "मिता, ती पहिली कंपनी होती जिथे मी कामाला सुरुवात केली होती. मला तिथे बरच काही शिकायला मिळालं होत. तिथे माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. मी जरी कंपनी सोडली असली तरी माझा मन तिथे अडकून आहे. त्यात परत नव्याने काम शोधणे, परत नवीन रूटीन सुरू करणे या गोष्टी पण आहेत. हे सर्व कसं करायचं ते मला समजत नाहीये. मी इथेच अडकून पडेन की काय अस वाटत. म्हणून मन अस्वस्थ होत आहे".

मिता तिला म्हणाली, "अग निशा तू जे सांगत आहेस त्यात चुकीचं किंवा वेगळं काही नाही. एखाद्या ठिकाणी राहिल्यावर त्या जागेचा, त्या माणसांचा लळा लागण, तिथे आठवणी तयार होणं स्वाभाविक आहे. हा माणसाचा गुणधर्म आहे आणि तू जे अडकून पडण्याविषयी म्हणत आहेस तर त्याबद्दल एक विचार कर, तू नदी पहिली आहेस ना! कशी असते सांग ती"? "वाहत असते, खळखळत असते". निशा. "बरोबर! नदी नेहमी वाहत असते. नदीला एक प्रवाह असतो. तिच्या प्रत्येक प्रवाहामध्ये तिला काही ना काही  मिळत असत. कधी छान छान मासे, कधी सुंदर वनस्पती तर कधी मोठी मोठी कातळ. पण म्हणून ती कधीतरी कुठे थांबलेली पहिली आहेस का तू? समोर छान मासे असु देत किंवा भलेमोठे कातळ, ती त्या सर्वांसोबत राहून, सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असते. प्रवाह वाईट असुदे किंवा चांगला, ती कोणामध्येही अडकून पडत नाही. कारण जर पाणी अडकल तर काय होत सांग? "एका जागी साचलेले पाणी खराब होत, दुर्गंधी येणार त्यातून".  निशा.

"अगदी खरं, म्हणूनच ही दुर्गंधी येऊ नये यासाठी नदी नेहमी प्रवाहासोबत पुढे जाते आणि हा नवा मार्ग काही दर वेळी सोपा नसतो. मध्ये दगड लागले की त्यांना आपटून जावं लागत, खोल दरी असेल तर त्यातून जावं लागत. पण ती जाते इतकं खर आणि तिच्या या अश्या अखंड जाण्याने ती नेहमी निर्मळ राहते, खेळती राहते".

"निशा आपलं आयुष्य हे या नदीहून काही फार वेगळं नाही ग! आपल्या या आयुष्याचा प्रवाहामध्ये अनेक चांगले वाईट अनुभव, माणसं, आठवणी आपल्याला मिळत जातात. त्या त्या वेळी आपण त्या अनुभवाव्यात. चांगल हसावं, रडाव त्या क्षणाला तिथे जगावं. पण त्याचबरोबर नवीन अनुभवांना, नवीन आठवणी तयार करण्यासाठी पण तयार व्हाव. आपल्या आयुष्याचा हा प्रवाह नेहमी चालू ठेवावा. कारण यात जर अडकून पडलो तर आपल्या आयुष्याला पण एकप्रकारची दुर्गंधी येऊ लागेल. ती यायची नसेल तर मात्र प्रवाहासोबत जावं लागणार. तरच आपलं आयुष्य खळाळत, निर्मळ राहील.



मग होशील ना या तयार  आयुष्याच्या या नवीन प्रवाहात सामील व्हायला? त्यातून प्रवास करायला"? 

"हो नक्की! तुझ्यासारखे सोबती असतील तर हा नवीन प्रवाह सुरू करायला खूप मला खूप आवडेल".... निशा हसून म्हणाली.

- काव्या गगनग्रास (एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)




Comments

  1. खुपच छान... प्रवाह सुरु राहिला पाहिजे 😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

आयुष्यातील उत्सुकता कुठंतरी हरवून चाललीये......

 "अरे एक नवीन वेबसिरीज आलीय, खूप भारी आहे रे पण दर आठवड्याला फक्त एक एपिसोड, एक आठवडा थांबायचं, माझ्यात नाही बाबा इतके patience." "इतकंच ना, कश्याला टेन्शन घेतोस मी देतो तुला एक लिंक, त्यावरून सर्व एपिसोड डाउनलोड करता येतात. बघून टाक एकाचवेळी.... इतकं काय त्यात?"  हे आहे आपलं आताचं आयुष्य. फोनच्या एका क्लिकवर चालणारं. काही हवं झालं ऑर्डरचं बटन दाबा, काही माहिती हवी लिंक क्लिक करा.  काही शिकायचं आहे यूट्यूब आहे ना! आता या क्षणाला मला काहीतरी हवं आहे आणि त्यासाठी मला वाट पाहायला लागेल ही परिस्थिती आता कुठेतरी कमी होत चाललीये.  लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की प्रतीक्षा असायची ती गोळेवाल्याची, घंटीचा आवाज आला की आपण पैसे गोळा करून त्याची वाट पाहत बसायचो की कधी तो आपल्या घराजवळ येईल, या वाट पाहण्यात एक मजा होती, एक उत्सुकता होती. की आपल्याला यावेळी कोणता गोळा खायला मिळेल. आईकडून एक एक रुपया मिळाला तरी त्यातून काय घेऊ आणि काय नको असं व्हायचं. नवीन मुव्ही आलंय हे समजायचं ते फक्त थिएटरबाहेर लागलेल्या पोस्टर वरून आणि मग बाबांच्या मागे लागणं सुरू व्हायचं की आम्हाला ...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...