Skip to main content

फक्त अंगठा तुटला होता....

नेहमीप्रमाणे मी आणि माझ्या सासूबाई आज देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जायला निघालो होतो. मंदिरात जाताना आम्ही रिक्षा केली. दोघी छान गप्पा मारत, इकडच्या तिकडच्या गोष्टी करत निघालो. मंदिर आल, आम्ही आवारातून पूजेचं सामान घेतल  व आत गेलो. देवीच दर्शन घेतलं आणि थोडावेळ बसून घरी परत यायला निघालो. पण मंदिरातून येताना व्ह्यायच ते झालं. मंदिर जास्त प्रसिद्ध असत ते तिथल्या देवासाठी आणि दुसर म्हणजे काढून ठेवलेल्या चपलांसाठी. कश्या चपला चोरीला जातात, मग काहीवेळा काही अतरंगी लोक कसं दुसऱ्याच चप्पल घालून जातात. एक ना अनेक. आज पण तसच झालं. पण जरा वेगळा प्रकार. म्हणजे गोष्ट चपलाचीच होती पण माझ चप्पल काही चोरीला गेला नाही. झालं असं, आम्ही यायला निघालो; दुपारची वेळ त्यामुळे रिक्षा फार नसतात म्हणून आम्ही चालत यायचं ठरवलं. मंदिराच्या बाहेर दोन पावलं टाकते इतक्यात माझ्या चपलाचा अंगठा तुटला. 

सासूबाईंनी ते पाहिलं आणि त्यांच्या बोलण्याची गाडी सुरू झाली. "अरे देवा! चप्पल तुटलं तुझ, आता कशी चालणार आहेस तू. त्यात इथे एक रिक्षा नाही. आताच हे सर्व व्हायचं होत. कठीण होऊन बसलं सर्व. आता काय करायचं आपण? या तुटक्या चपलेने चालायला लागलीस आणि पडलीस म्हणजे." त्यांच्या बोलण्यातून त्यांची माझ्याविषयी असणारी काळजी, प्रेम सर्व दिसत होत. मला त्याविषयी खूप आदर होता. पण त्या ज्या पद्धतीने फक्त अंगठा तुटला म्हणून रिअॅक्ट होत होत्या ते काळजी च्या पलिकडे जात होत. 

मी त्यांना समजावलं, "आई माझ पूर्ण चप्पल नाही तर फक्त त्याचा एक अंगठा तुटला आहे. तुमची काळजी मला समजते. पण आई ही इतकी मोठी गोष्ट नाही जितकी तुम्ही समजत आहात. आपण जेवण करताना दोन लोकांच्या जेवणासाठी १०लोकांचं जेवण करतो का?" यावर आई म्हणाल्या, "अग दोन लोकांसाठी दहा जणांच जेवण कश्याला? वाया घालवायला." मी म्हणाले, "बरोबर, तसच आहे हे. पूर्ण चप्पल तुटलं असत तर कदाचित मला चालताना अडचण झाली असती. पण अस झालय का? नाही". अस म्हणून मी माझी पर्स चाळू लागले. मला त्यात एक पिन मिळाली. मी ती काढून त्याने चपलाचा अंगठा जोडला व आईना दाखवत म्हणाले, "आई झाली का अवघड गोष्ट सोपी?" 

आई माझ्याकडे पाहत म्हणाल्या, "खरच ग! मी उगाच इतकं टेन्शन घेतल. हे तर किती सोप्पं होत. राईचा पर्वत केला मी." "मी हसून म्हटल, आई तुम्ही खुशाल करा राईचा पर्वत, मी आहे ना तुमच्यासोबत त्याची परत राई करायला." असा हा आमचा परतीचा प्रवास तुटलेल्या अंगठ्याला पुन्हा जोडून सुरू झाला.

मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात अनेक अश्या गोष्टी घडत असतात ज्या अचानकपणे घडतात. ज्याची आपल्याला त्या वेळी खरतर कल्पना नसते. पण कोणती गोष्ट कधी घडेल हे जरी आपल्या हातात नसलं तरी त्यावर वागायचं कसं विचार कसा करायचा हे नक्कीच आपल्या हातात आहे. कोणतीही गोष्ट जितकी घडली आहे, जेवढं तीच महत्त्व आहे तेवढंच तिला द्यावं. अनेकदा आपण विनाकारण गोष्टी आहे त्याहून वाढवतो. ज्याचा त्रास आपल्याला व आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनीही होतो. पायात काटा रुतला तर तो काट्याने काढावा अस म्हणतात. त्याला तलवार घेऊन चालेल का? नाही. कारण ती जखमच इतकी छोटी आहे की त्याला तेवढी छोटी गोष्ट पाहिजे. तसच कोणतही गोष्ट घडली की त्याला पूर्णपणे न वाढवता किंवा पूर्णपणे न कमी करता आहे पाहिजे तेवढ लक्ष देऊन सोडवायचा प्रयत्न करावा. तर समस्या सुटण्याची शक्यता जास्त आहे. बऱ्याचदा गोष्टी नको तितक्या वाढवून आपण अधिकच्या समस्यांना आमंत्रण देतो. कोरोना काळात अनेक लोकांच्या दगावण्याची कारण शारीरिक सोबत मानसिक ही होती. बऱ्याच जणांना शारीरिक लक्षण नसताना, त्यातून ते बरे झालेले असताना ही बर वाटत नव्हता याचा कारण होत अतिप्रमाणात केलेली चिंता. त्या परिस्थितीला त्यांनी मनात इतकं मोठं केलं ज्यामुळे शरीराने बर होऊनही मनात प्रचंड चिंता राहिली, भीती राहिली आणि पुढील गोष्टींना नंतर पुन्हा सामोरं जावं लागलं.

म्हणून जितकं ज्याचं महत्त्व तितकं त्यावर लक्ष देणे, तेवढी त्याची काळजी घेणे केव्हाही योग्य ठरत.


काव्या धनंजय गगनग्रास
एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...